ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल पै.नाना डोंगरे यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 22, 2021

ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल पै.नाना डोंगरे यांचा सत्कार

 अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल पै.नाना डोंगरे यांचा सत्कार


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः निमगाव वाघा ग्रामपंचायत निवडणुकीत पै. नाना डोंगरे मताधिक्याने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, शहर अध्यक्ष नामदेव तात्या लंगोटे, माजी नगरसेवक सुनिल भिंगारदिवे, कुमार सुसरे, प्रशांत मुथा, शकिल शेख, अक्षय औसरकर आदी उपस्थित होते.
   पै.वैभव लांडगे म्हणाले की, लाल मातीत तयार झालेले मल्ल राजकीय आखाडे गाजवत आहे. पै. नाना डोंगरे यांचे सामाजिक व कुस्ती क्षेत्रात मोठे योगदान असून, गावाच्या विकासासाठी ते विश्वासास पात्र ठरणार आहे. ग्रामस्थांनी सर्वसामान्य व्यक्तीला निवडून काम करण्याची संधी दिली असून, हा जनशक्तीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. पै.नाना डोंगरे म्हणाले की, गावाच्या सामाजिक कार्यात सक्रीय राहून राजकारणात आलो असलो तरी, सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे. समाजसेवा हा एकमेव उद्दीष्ट समोर ठेऊन ग्रामपंचायतमध्ये कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment