नाबार्डच्या अधिकार्‍यांकडून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या कारभाराचे कौतुक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

नाबार्डच्या अधिकार्‍यांकडून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या कारभाराचे कौतुक

 नाबार्डच्या अधिकार्‍यांकडून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या कारभाराचे कौतुक


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगरमधील अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या आर्थिक कामगिरीचे व एकूणच कामकाजाचे नाबार्डच्या तपासणी अधिकार्यांनी कौतुक केले आहे. संस्थेकडून सभासदांना केला जाणारा कर्जपुरवठा, ठेवीमधील सातत्य, कॅश क्रेडिट पेक्षा कर्जावर तीन टक्के कमी व्याजदर आकारणी, सभासद हिताच्या योजना अशा उपक्रमांसाठी सोसायटीच्या व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. नाबार्डचे असिस्टंट जनरल मॅनेजर राजेश अग्रवाल, शिलकर जगताप, जिल्हा बँकेचे बिगर शेती विभागाचे जनरल मॅनेजर एन.के.पाटील, जी.जे.कोकाटे, वाळूंजकर आदी यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नाबार्ड अंतर्गत तपासणी सध्या सुरु आहे. जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीस जिल्हा बँकेकडून पतपुरवठा होत असल्याने नाबार्डच्या तपासणी अधिकार्यांनी सोसायटीस भेट दिली. यावेळी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे यांनी नाबार्डच्या अधिकार्यांचे स्वागत करून सोसायटीच्या कारभाराची माहिती दिली.
नाबार्डच्या अधिकार्यांनी संस्थेची आर्थिक पत्रके, संस्थेचा व्यवहार, संस्थेच्या सभासद हिताच्या योजना, कामकाजातील अत्याधुनिकीकरण याबाबत समाधान व्यक्त केले. प्रा.कचरे यांनी सांगितले की, जिल्हा माध्यमिक शिक्षण सोसायटी सभासदांना केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असलेली संस्था असून पगारदार नोकरांच्या पतसंस्थांमधील राज्यातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. अमृतमहोत्सव साजरा करणार्या संस्थेने उत्कृष्ट कारभाराची परंपरा कायम राखली आहे. सभासद, ठेवीदार यांना उत्कृष्ट सेवा देताना कमीत कमी व्याजदराने कर्ज पुरवठा व ठेवींवर जास्तीत जास्त व्याज देण्याचा संस्थेने कायम प्रयत्न केला आहे.

No comments:

Post a Comment