उमेदवारच नसल्याने या गावात झाली आरक्षण बदलाची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

उमेदवारच नसल्याने या गावात झाली आरक्षण बदलाची मागणी

 उमेदवारच नसल्याने या गावात झाली आरक्षण बदलाची मागणी 


अहमदनगर : धनगरवाडी येथील सरपंचपदाचे आरक्षण अनुसुचित जमाती स्त्री वर्गासाठी निघाले मात्र या वर्गाचा उमेदवार नसल्यामुळे हे आरक्षणात बदल करवा या मागणीचे निवेदन धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे .

धनगरवाडी ( तानगर ) येथील ग्रामपंचायतीची निवडणुक मुकतीच पार पडली . काल दि. २८ रोजी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात अनुसुचित जमाती स्त्री वर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण पडले. या पदासाठी एकही जागा नसल्याने त्या प्रवर्गातील उमेदवारच नाही.  सरपंच पदाचे आरक्षण पडलेल्या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने सरपंचपद पाच वर्ष रिक्त राहणार आहे. मागील पंचवर्षीक  निवडणुकीतही याच प्रवर्गतील जागा उमेदवारा अभावी रिक्त होती.सरपंचपद रिक्त राहिल्यास गावच्या विकासात अडचणी निर्माण होणार आहे,  तरी जिल्हाधिकारी यानी याचा विचार करून सरपंचपदाच्या आरक्षणात नियमामुसार बदल करावा असे निवेदन संदिप शिकारे, प्रविण शिकारे, सचिन शिकारे, निलेश शिकारे, अर्जुन शिकारे, सुनिल शिकारे, विशाल शिकारे, अशोक शिकारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे

No comments:

Post a Comment