औरंगाबाद खंडपीठाच्या निवडणूक आयोगासह इतरांना नोटिसा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 19, 2021

औरंगाबाद खंडपीठाच्या निवडणूक आयोगासह इतरांना नोटिसा !

 औरंगाबाद खंडपीठाच्या निवडणूक आयोगासह इतरांना नोटिसा !

प्रभाग क्रं. 9 निवडणूक प्रक्रिया

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिकेच्या प्रभाग क्र.9 क च्या सदोष निवडणूक प्रक्रियेबद्दल मा.औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिके प्रकरणी राज्य निवडणूक आयोगासह इतरांना नोटीस काढण्यात आलेल्या आहेत अशी माहिती याचिकाकर्ते निलेश म्हसे यांनी दिली आहे.
महानगरपालिका निवडणूक 2018 मधे प्रभाग क्र.9 क ची निवडणूक प्रक्रिया राबवीत असतांना तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चुकीची निवडणूक छाननी प्रक्रिया राबविली असल्याने त्यामुळे सदरची निवडणूक सदोष झालेली असल्याने मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.सदर प्रकरणी दि.18 डिसेंबर 2020 रोजी सुनावणी होऊन मा.न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस काढून म्हणणे सादर करण्यास आदेश दिलेले आहेत. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोग,निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिका व सर्व प्रतिस्पर्धी उमेदवार यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. या प्रकरणी अहमदनगर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती परंतु येथील न्यायालयाने सदर याचिका रद्द केलेली होती. त्यामुळे मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. पुढील सुनावणी दि.28/1/2021 रोजी ठेवण्यात आलेली आहे. असे म्हसे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment