आष्टी मतदार संघातील नेत्यांना फुशारकी मारण्याची सवय ः आ. आजबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 20, 2021

आष्टी मतदार संघातील नेत्यांना फुशारकी मारण्याची सवय ः आ. आजबे

 आष्टी मतदार संघातील नेत्यांना फुशारकी मारण्याची सवय ः आ. आजबे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

आष्टी ः ग्रामपंचायत निवडणुकीत आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघात जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ,काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला आहे परंतु आष्टी मतदार संघातील आमचे विरोधक आणि काही राजकीय नेते फुशारकी मारतात. ही सवय चुकीची आहे. खोटे बोल पण रेटून बोल...  या म्हणीप्रमाणे दिशाभूल करणारे आकडे सांगतात.मतदार संघातील 90 टक्के  ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात आल्या असल्याचे दर्शवित आहेत.विरोधकांचे हे दावे जनतेची दिशाभूल करणारे आहेत. या नेत्यांना जनता ओळखुन आहे. आष्टी विधानसभा मतदार संघात विरोधकांना काहीही दिसले की माझेच आणि  मिच केले असे म्हणायची सवयच आहे. महाविकास आघाडी कधीच दिशाभुल करणारे व फसवेगीरी करणारे दावे करीत नाही. आष्टी विधानसभा मतदार संघातील काही राजकीय नेते माझीच लाल म्हणतात... असे राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब आजबे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.
   आ.बाळासाहेब आजबे हे  आष्टीत संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. काल व आज आज आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य मला भेटण्यासाठी आले होते. यातील बहुतांश सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारे आहेत तर काही महाविकास आघाडीतील घटक पक्षाला मानणारे आहेत. त्यामुळे सहाजिकच मतदारसंघात भाजपापेक्षा महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य जास्त संख्येने निवडून आले आहेत. माञ विरोधक खोटे बोल पण रेटुन बोल या तत्वाने वागतात. बोलतात. भाजपवाल्यांची  आकडे हे जनतेची दिशाभूल करणारे आहेत. शहरी व ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीबाबत जनतेमध्ये नकारात्मक भूमिका तयार झालेली आहे.
   मतदार संघातील जनताही महाविकास आघाडीच्या बाजूने उभी आहे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुतांश ग्रामपंचायततिचे नवनिर्वाचित सदस्य आपणाकडे आले असता आपण सर्वांचे फेटा बांधून सत्कार केले आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोटे दावे केले तरी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीला जनतेने कौल दिलेला आहे. आष्टी शहरातील रस्ते रुंदीकरण कामानिमित्ताने कोणी गरीबांचे दुकाने पाडली आहेत. कोण कीती हुकुमशाही करीत आहे.याबाबत आता लक्ष देणार आहोत. गोरगरीबांच्या बाजुने उभे राहुन आता रस्त्यावर येणार आहे असेही आ.बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

No comments:

Post a Comment