बहुळा कामधेनु गोमातेचा तेराव्याचा कार्यक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 30, 2021

बहुळा कामधेनु गोमातेचा तेराव्याचा कार्यक्रम

 बहुळा कामधेनु गोमातेचा तेराव्याचा कार्यक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी

आष्टी ः कर्जत तालुक्यातील मुळेवाडी येथे बहुळा कामधेनु (वय वर्ष 24) दि.20जानेवारी2021 रोजी वैकुंठ गमन झाले आहे.तेरावा निमित्ताने श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
  श्री दत्त योगिराज बहुद्देशीय सामाजिक वारकरी शालेय व शिक्षण संस्था सौ रुख्मिणी आईसाहेब गोशाळामुळेवाडी  ता. कर्जत जि. अ. नगर जिल्ह्यातील नव्हे  तर संपुर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर सर्व दुर ख्याती झालेली ही संस्था म्हणजे.इवलेसे रोप लावियेले व्दारी । त्याचा वेलु गेला गगनावरी या न्याया प्रमाने झालेली ही प्रगती म्हणजे 24 वर्षापुर्वी श्री बाजीराव सुद्रिक कौडाणे या. भाविकाने सदाशिव भाऊ सुद्रिक यांना दिलेल्या या बहुळा कामधेनु गोमातेने गगन भरारी घेत या सुद्रिक पाटील परिवारास अशी प्रेरणा दिली की आज तिच्या प्रेरणेने व ह. भ. प. कर्मवीर दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील  यांनी तिचा साभांळ अगदी प्रेमाने केला.त्याच बहुळा गोमातेची प्रेरणा घेऊन ह. भ. प.रामायणाचार्य रविंद्रनाथ महाराज सुद्रिक पाटील यांनी 6 वर्षापुर्वी श्री दत्त योगिराजबहुद्देशीय सामाजिक वारकरी व शालेय शिक्षण आश्रमाच्या माध्यमांतुन स्थापन केलेल्या सौ.रुख्मिणी आईसाहेब गोशाळाचा भव्य दिव्य असा विस्तार झाला परंतु दि.20/1/2021रोजी या बहुळा कामधेनुचे वैकुंठ गमन झाले.त्यामुळे  सुद्रिक परिवारच नव्हे संपुर्ण आश्रमावर व गोशाळेवर जिवापाड प्रेम करणार्या सर्व भाविकांना दुःख झाले, या बहुळा कामधेनु गोमातेचा तेराव्याचा कार्यक्रम आयोजित करुण आश्रु नयनांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संस्था परिवाराने दि.24/1/2021 पासुन बहुळा कामधेनु स्मृतिप्रित्यर्थ कु. गिताजंली दिदी, पाचपुते यांची भव्य दिव्य अशा भागवत कथा ज्ञान यज्ञ व किर्तन सोहळा आयोजित केला आहे. त्याची सागंता दि.31/1/2021 रविवारी सकाळी 10ते 12या वेळेमध्ये खानदेश रत्न भागवतचार्य *ह.भ.प.प.पु देवगोपाल शास्त्रजी* जि. जळगांव यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाच्या पंगतीने सांगता होईल तरी सर्व परिसरातील भावीकानी याचा लाभ घ्यावा  असे आवाहन ह.भ.प.रविंद्रनाथ महाराज सुद्रिक  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment