श्रीराम मंदिरासाठी प्रत्येकाचे योगदान असावे ः भास्करगिरी महाराज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

श्रीराम मंदिरासाठी प्रत्येकाचे योगदान असावे ः भास्करगिरी महाराज

 श्रीराम मंदिरासाठी प्रत्येकाचे योगदान असावे ः भास्करगिरी महाराज

विशाल गणेश मंदिराच्यावतीने राम मंदिर निर्माणासाठी 1,11,111 रुपयांची मदत

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण कार्यास शुभारंभ झाला ही जगभरातील हिंदूंसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. प्रभु रामचंद्रांच्या मंदिर निर्माणात सर्वांचा सहभाग असावा, यासाठी मंदिर निर्माण समितीच्यावतीने मोठ-मोठ्या शहरांपासून गावपातळीवरील भाविकांचा हातभार असावा या उद्देशाने मदत निधी संकलन सुरु केले आहे. मंदिर निर्माणाचा आराखडा तयार झाल्यावर अनेक उद्योजक, संस्था, बालाजी, शिर्डी सारख्या मोठमोठ्या देवस्थानच्यावतीने देणगी देऊन मंदिर उभारण्यासाठी मोठा निधी देण्याचे जाहीर केले. परंतु आयोद्धेतील श्रीराम मंदिर हा प्रत्येकाचा आस्थेचा, भावनेचा प्रश्न असल्याने यात प्रत्येकाचे योगदान असावे, या कार्यात आपलाही सहभाग आहे, हा अभिमान असावा म्हणून सर्वांकडून देणगी स्वरुपातून मंदिर निर्माणाचे कार्य सुरु आहे. या कार्यात नगरमधील जास्तीत-जास्त श्रीराम भक्तांना सहभागी व्हावे, असे आवाहन महंत हभप भास्करगिरी महाराज यांनी केले.
   अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी नगरमधून निधी संकलन अभियानाचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने रु. 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते हभप भास्करगिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द करुन करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, महंत संगमनाथ महाराज, रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, गजानन ससाणे आदि उपस्थित होते.
   याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, आयोद्धेत श्रीराम मंदिर निर्माण होत आहे ही सर्वांसाठी गर्व वाटवा, अशी घटना आहे. गेल्या अनेक वर्षांची तपश्चर्या यानिमित्त फळाला आली आहे. या ठिकाणी निर्माण होणारे प्रभु रामचंद्रांचे मंदिर अवध्या विश्वाला शांती, प्रेम आणि एकतेचा संदेश देणारे ठरणार आहे. मंदिर निर्माण कार्यात प्रत्येकाला सहभागी होण्याची संधी मिळत आहे, त्याचा भाविकांनी लाभ घेऊन पुढील हजारो वर्षांपर्यंत प्रेरणा देणार्या या मंदिर निर्माणात सहभागी व्हावे, असे आवाहन करुन श्री विशाल मंदिर देवस्थानच्यावतीने 1 लाख 11 हजार 111 रुपये देऊन या सत्कार्यात सहभागी झालो असल्याचे सांगितले.
   यावेळी महंत संगमनाथ महाराज यांनी 11,111, विश्वस्त विजय कोथिंबीरे 11,111, सचिव अशोकराव कानडे 5,555 आदिंसह भाविकांनी देणगी दिली. कार्यक्रमास डॉ.रविंद्र साताळकर, राजाभाऊ मुळे, शांतीभाई चंदे, वसंत लोढा, गजेंद्र सोनवणे, अनिल रामदासी, श्रीकांत जोशी, आबा मुळे, हिराकांत रामदासी, संजय चाफे, विक्रम राठोड, सचिन पारखी, नंदकिशोर शिकरे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment