श्रीवारुळाचा मारुती मंदिर देवस्थानास मिलिंद गुंजाळांकडून स्वच्छता यंत्र भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 9, 2021

श्रीवारुळाचा मारुती मंदिर देवस्थानास मिलिंद गुंजाळांकडून स्वच्छता यंत्र भेट

 श्रीवारुळाचा मारुती मंदिर देवस्थानास मिलिंद गुंजाळांकडून स्वच्छता यंत्र भेट


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरातील ऐतिहासीक जागृत देवस्थान श्री वारुळाचा मारुती मंदिर येथील परिसर साफ सफाई करण्यासाठी नवग्रह प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष मिलिंद गुंजाळ यांनी मंदिर देवस्थानाला स्वच्छता यंत्र भेट दिले.
   जागृत देवस्थान वारुळाचा मारुती मंदिर येथे मिलिंद गुंजाळ हे दर शुक्रवारी संध्याकाळी मंदिरातील व परिसरातील स्वच्छतेची सेवा करतात. मंदिर परिसर मोठा असल्याने दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागत असे. याचा विचार करुन टेक्निकलच्या जमान्यात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास मंदिर परिसरातील स्वच्छतेचे काम सोपे होईल व मंदिर परिसर प्रसन्न राहील असा आशावाद यावेळी मिलींद गुंजाळ यांनी व्यक्त केला.
   यावेळी ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज, ह.भ.प. बाळासाहेब वाघ, शंकर बहीर, विजय वाडेकर, राम साठे, मनोज रोहोकले, गोटु रावळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment