सत्तेचा विषाणू लोकशाहीला जगू देईल का? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 15, 2021

सत्तेचा विषाणू लोकशाहीला जगू देईल का?

 सत्तेचा विषाणू लोकशाहीला जगू देईल का?

याविषयावर असीम सरोदे यांच्याशी संवाद

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः सत्तेचा विषाणू लोकशाहीला जगू देईल का? याविषयावर जाहीर संवाद कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर डिबेट आणि पीस फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती निमित्त आयोजित या कार्यक्रमात राजकारण, सत्ता, लोकशाही यावर आर्किटेक्ट अर्षद शेख व मकरंद घोडके यांच्या थेट, सडेतोड प्रश्नांची बेधडक उत्तरे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अ‍ॅड असीम सरोदे देतील.
   राजकारण हा विषय आता आमच्या सगळ्या नागरिकांच्या जीवनाला स्पर्श करणारा झाला आहे. नागरिकांनी राजकीय पक्ष व विशिष्ट राजकीय नेते यांच्या पलीकडे जाऊन विचार करावा, सत्ता कुणासाठी राबविली जातेय याची उत्तरे समजून घेतांना लोकशाही समजून घेणे आवश्यक ठरते. यासाठी समाजात मुद्यांवर आधारित वाद-विवाद झाले पाहिजेत तरच संवाद वाढेल या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन ‘अहमदनगर डिबेट’ व पीस फौंडेशन तर्फे करण्यात येत असल्याचे अर्षद शेख यांनी सांगितले. दि. 16 जानेवारी रोजी फरहत हॉटेलच्या सभागृहात संध्याकाळी 7 वाजता आयोजित या कार्यक्रमासाठी अहमदनगर मधील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला येणार्‍या श्रोत्यांची ऑक्सिमीटर द्वारे तपासणी व हात सॅनिटाइझ केल्यावर त्यांना सभागृहात सोडण्यात येईल.

No comments:

Post a Comment