माळीवाडा परिसरातील कामे तातडीने पुर्ण होण्यासाठी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यासह अधिकार्‍यांची पाहणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 30, 2021

माळीवाडा परिसरातील कामे तातडीने पुर्ण होण्यासाठी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यासह अधिकार्‍यांची पाहणी

 माळीवाडा परिसरातील कामे तातडीने पुर्ण होण्यासाठी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यासह अधिकार्‍यांची पाहणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईटची व्यवस्था करण्यासाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या फेज-2 पाणी योजना, तसेच अमृत योजनांची कामे शहरातील विविध भागात सुरु आहेत. ही कामे होत असतांना संबंधितांकडून रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांची तर दुरावस्था झालीच आहे, त्याचप्रमाणे पाण्याच्या लाईन व ड्रेनेज लाईनही फूटून त्यातील पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे सर्वत्र रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने आम्ही याबाबत योजनेचे समन्वयक व मनपा अधिकार्यांना माळीवाडा परिसरात बोलावून ही कामे तातडीने मार्गी लावून रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली.
   माळीवाडा भागातील अंतर्गत रस्ते अमृत गटार योजना, फेज-2 व इतर कामांची पाहणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांनी केली. याप्रसंगी मनपा अभियंता सुरेश इथापे, अमृत योजनेचे विभागप्रमुख श्री.सातपुते, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे अभियंता आदि उपस्थित होते. याप्रसंगी परेश लोखंडे यांनीही माळीवाडा परिसरातील विशाल गणेश मंदिर ते पंचपिर चावडी, वाडिया पार्क ते होसिंग हॉस्पिटल, माणिक चौक ते आशा टाकीज पर्यंतचे रस्ते पाणी व ड्रेनेजलाईनसाठी खोदले आहेत. परंतु ते व्यवस्थित दुरुस्त न केल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. तातडीने हे काम होणे गरजेचे असल्याने संबंधित अधिकार्यांना या कामाबाबत विचारणा करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी अमृत विभागप्रमुख श्री.सातपुते व मनपा अभियंता सुरेश इथापे यांनी ही कामे लवकरच मार्गी लावून रस्त्याची कामे सुरु करु, असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment