फिर्यादीचे वकील व जरेंच्या मुलाची मागणी.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

फिर्यादीचे वकील व जरेंच्या मुलाची मागणी..

 फिर्यादीचे वकील व जरेंच्या मुलाची मागणी..

रेखा जरे हत्याप्रकरणाचा खटला, फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा.

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः रेखा जरे हत्याप्रकरण खटल्याची लवकर सुनावणी होऊन न्याय मिळावा, यासाठी विशेष सरकारी वकील ऍड. निकम किंवा ऍड. यादव यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी रुणाल जरे व फिर्यादीचे वकील पटेकर यांनी पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडे केली आहे.
   जिल्हा पोलिस अधिकार्‍यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याविरोधात सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तो आता फरार झाला आहे. त्याचा ठावठिकाणा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे चौकशी रेंगाळली असून संशयाला वाव मिळत आहे. संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजत असताना दीड महिना होऊनही बोठे पोलिसांना सापडत नाही. ब्लॅकमेलिंग हाच बोठेचा प्रमुख व्यवसाय आहे. त्याचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला असून त्यामधील कॉल डिटेल मुख्य पुरावा ठरणार आहेत. आरोपी बोठे आपल्या वकिलांच्या संपर्कात नियमित असताना पोलिसांनाच त्याचा ठावठिकाणा कसा सापडत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment