‘जीना ईसी का नाम है’ कार्यक्रमातून स्व. मुकेश यांच्या आठवणींना उजाळा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

‘जीना ईसी का नाम है’ कार्यक्रमातून स्व. मुकेश यांच्या आठवणींना उजाळा

 ‘जीना ईसी का नाम है’ कार्यक्रमातून स्व. मुकेश यांच्या आठवणींना उजाळा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः येथील जीवन संगीत ग्रुपच्यावतीने गायक स्व.मुकेश यांच्या गीतांवर आधारित ‘जीना ईसी का नाम है’ हा सुमधूर गीतांचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.  स्व.मुकेश यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारने उद्योजक अभय कांकरिया व पार्श्वगायिका संगीता भावसार यांनी हा कार्यक्रम सादर केला.
जीवन संगीत ग्रुपने प्रथमच गायक स्व.हेमंतकुमार, स्व. मोहंमद रफी, स्व.मन्ना डे, स्व. किशोर कुमार, कुमार सानू असे यांच्या गाण्यांचे बहारदार कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ‘शांती ऑडिओ लाईव्ह’ या फेसबुक पेजवर सादर केले. त्यास देशाबरोबरच परदेशात देखील मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातीलच पुढील भाग हा स्व.मुकेश यांच्या गाण्यांचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
   या कार्यक्रमाची सुरुवात अभय कांकरिया  यांच्या फुल बने अंगारे या चित्रपटातील ‘चाँद आहे भरेगा’ या अत्यंत श्रवणीय गीताने झाली. त्यानंतर संगिता भावसार व अभय कांकरिया यांनी बहारदार ‘किसी राह पर किसी मोडपर..’, ‘एक प्यार का नगमा..’, मैं ना भुलूंगा..’ ‘हम सफर मेरे हम सफर..’, ‘ इब्तेदा-ए-ईश्क..’, ‘क्या खुब लगती हो...’ अशी युगलगीते सादर केली. ‘ओ महेबुबा...’ या संगम मधील मुकेशजींच्या गीताने कार्यक्रमांची सांगता झाली. कार्यक्रम खूप चांगला झाल्याची पावती प्रेक्षकांनी फेसबुकवर आपल्या प्रतिक्रियांद्वारे दिली. संदिप भुसे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्क्रिप्ट डिझायनर वाजीद शेख, लाईट साऊंड राजू ढोरे, दिनेश घेवरे, अभिनंदन ढोरे, मिलिंद लोणे यांनी विशेष परिश्रम घेतले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमांत अनेकांनी सहभागी होऊन लाईक्स दिल्या.

No comments:

Post a Comment