अर्बन बँकेच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका ः मिश्रा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 15, 2021

अर्बन बँकेच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका ः मिश्रा

 अर्बन बँकेच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका ः मिश्रा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः गेल्या वर्षापासून अर्बन बँकेचा प्रशासक म्हणून काम पाहतांना वेळोवेळी नवनीतभाई बार्शीकरांच्या नावाचा उल्लेख झाला. त्यामुळे चेअरमन म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय मला झाला आहे. आदर्शवत कार्य नवनीतभाई बार्शीकर यांनी आपल्या चेअरमनपदाच्या काळात केले आहे. अर्बन बँकेच्या प्रगतीत स्व.नवनीतभाई बार्शीकरांचे मोठे योगदान आहे. आर.बी.आय.च्या मार्गदर्शक तत्वानुसार अर्बन बँकेच्या चाकण व सिन्नर या तोट्यात चाललेल्या शाखा बंद करण्याचा निर्णय बँकेचे हित पाहूनच घेतला आहे. मात्र काही जण जाणूनबुजून सोशल मीडियामधून बँकेबद्दल अपप्रचार करत आहेत. तरी सर्व सभासद, ठेवीदार व कर्जदारांनी अर्बन बँकेच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी केले.
   स्व.नवनीतभाई बार्शीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नगर अर्बन बँकेत त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे, प्रमुख व्यवस्थापक सुनील काळे, राजेंद्र डोळे आदिंसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment