बसपाच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय मिळणार ः यादव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 15, 2021

बसपाच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय मिळणार ः यादव

 बसपाच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय मिळणार ः यादव

यतिमखाना बोर्डिंगमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी व सहयोग दिन म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील यतिमखाना बोर्डिंग स्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, प्रा. अशोक डोंगरे, रमेश सोळसे, बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, पांडुरंग जाधव, अजय कुशवाह, अजित यादव, शैलेश यादव, यतिमखाना ट्रस्टचे विश्वस्त शाकिर शेख, गुफरान शेख, हारुन शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
   उमाशंकर यादव म्हणाले की, बहुजन समाज पार्टी बहुजन समाज संघटित करुन त्यांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीने आपले असतित्व दाखवून तेथे विकासाला चालना दिली. भाजप व काँग्रेस दोन्ही सरकार सत्तेवर असताना बहुजन समाजावर अन्याय झाला. बसपाच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय मिळणार असून, त्या दृष्टीने मायावतींचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. अशोक डोंगरे यांनी बहन मायावतीजींच्या विचार व मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टी वंचित व बहुजन समाजाला न्याय देण्याचे कार्य करीत आहे.

No comments:

Post a Comment