‘महात्मा गांधी’ पुतळ्यासमोर सत्याग्रह. केंद्र सरकारचा निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 30, 2021

‘महात्मा गांधी’ पुतळ्यासमोर सत्याग्रह. केंद्र सरकारचा निषेध

 ‘महात्मा गांधी’ पुतळ्यासमोर सत्याग्रह. केंद्र सरकारचा निषेध


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिनानिमित्त वाडियापार्क क्रीडा संकुल येथील त्यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनास बदनाम करून आंदोलन दडपून टाकत असल्याचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला.
   शेतकरी नेत्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, तीन अन्यायकारक शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार संहिता रद्द करा या मागण्या घेऊन शेतकरी आंदोलनास नैतिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधाता हुतात्मा दिन केंद्र सरकारच निषेध दिन म्हणून पाळण्यात आला. महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या सत्याग्रहाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये कॉ. सुभाष लांडे, अविनाश घुले, बन्सी सातपुते, महेबुब सय्यद, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, भैरवनाथ वाकळे, अर्शद शेख, अंबादास दौंड, रामदास वागस्कर, प्रशांत पाटील, भाऊसाहेब थोटे, अब्दुल गणी शेख, संध्या मेढे, बाळासाहेब भुजबळ, फिरोज खान, मार्गरेट जाधव, श्यामराव वाघस्कर, दिपक शिरसाठ, कान्हू सुंबे, बाळासाहेब सागडे, वैभव कदम आदी सहभागी झाले होते.
   यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात शेतकरींच्या दिल्ली येथील आंदोलनाची दखल न घेता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष व स्वयंसेवी संघटनेच्या पदाधिकार्यांनी पाठिंबा दिला.

No comments:

Post a Comment