बोठेच्या अटकपूर्व जामीनाची 28 जानेवारीला सुनावणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

बोठेच्या अटकपूर्व जामीनाची 28 जानेवारीला सुनावणी.

 बोठेच्या अटकपूर्व जामीनाची 28 जानेवारीला सुनावणी.


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पसार मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने पुढील सुनावणी 28 जानेवारीला घेणार असल्याचे स्पष्ट केले.
   मागील वर्षी म्हणजे 30 नोव्हेंबर 2020ला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे हा दीड महिन्यांपासून फरार आहे. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला आहे. मधल्या काळात त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्या निर्णयाविरोधात त्याने खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली आहे. तिची सुनावणी आज होती. न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागविले आहे. पुढील सुनावणी 28 जानेवारी होणार आहे.
   दीड महिन्यापासून बोठे पोलिसांना गुंगारा देत आहे. परंतू, तो मिळून आलेला नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यात छापे टाकले.पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भक्कम पुरावे गोळा केले असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी बोठे विरोधात पारनेर न्यायालयाकडून स्टँडिंग वॉरंट मंजूर करून घेतले असून हे वॉरंट राज्यातील पोलीस ठाण्यात पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर आता बोठे याने खंडपीठात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर 28 जानेवारीला काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment