बनावट खरेदी खताद्वारे जमीन विक्री करणारा फरार आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 15, 2021

बनावट खरेदी खताद्वारे जमीन विक्री करणारा फरार आरोपी जेरबंद.

 बनावट खरेदी खताद्वारे जमीन विक्री करणारा फरार आरोपी जेरबंद.


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः मयत व्यक्तीच्या जागी बनावट इसम उभा करून जमिनीची विक्री करणार्‍या पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर वय 40 वर्ष. रा. लिंपण गाव. ता. कर्जत या फरार आरोपीस सापळा लावून लाल टाकी येथे अटक करून स्थानिक गुन्हे शाखेकडून कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे पुढील तपास कर्जत पोलिस करत आहेत.
   याबाबत मिळालेली माहिती अशी कि  दिनांक 27 मार्च 2018 रोजी आरोपी नामे पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर, रा. लिंपनगाव, ता- श्रीगोंदा, निंभोरे मेजर, रा. घोटवी, ता- श्रीगोंदा यांनी व त्यांचे साथीदारांनी मिळून गुरव पिंपरी, ता- कर्जत येथील शेती गट नं. 674 मधील 22 एकर जमीन ही जमीनीचे मूळ मालक मयत झालेले असल्याचे माहीती असतानाही सदर जमिनीचे बनावट खरेदीखत तयार करुन सदरची जमिन ही श्री. एकनाथ बाळासाहेब बांदल, रा. करडे, ता- शिरुर, जि- पुणे व त्यांचे साथीदारांना विक्री केली होती. सदर जमिन खरेदीचे व्यवहारामध्ये फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी श्री. एकनाथ बाळासाहेब बांदल, रा. करडे, ता- शिरुर, जि- पुणे यांनी दि. 12 डिसेंबर 2020 रोजी कर्जत पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1 1135/2020, भादवि कलम 420, 465, 467, 468, 471, 472, 120(ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
   सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी हे नजरेआड झालेले होते. गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत मा. पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर यांनी सुचना दिल्याने त्याप्रमाणे पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोनि श्री. अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, सदर गुन्ह्यातील आरोपी नामे पुरुषोत्तम कुरुमकर हा लालटाकी, अहमदनगर परिसरात येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लालटाकी येथे जावून सापळा लावून मिळालेल्या माहितीवरुन आरोपीस अटक केली.

No comments:

Post a Comment