शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार ः महापौर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 11, 2021

शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार ः महापौर

 शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार ः महापौर

‘अमृत योजना’ पूर्ण करण्यासाठी खा. सुजय विखेंचा पुढाकार
मुळाडॅमते पंप हाऊस नवी पाईप लाईन

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी अमृत पेयजल योजनेअंतर्गत अहमदनगर शहरासाठी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व नागरिकांना 24 तास स्वच्छ पाणी मिळावे यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील  यांनी पुढाकार घेऊन, महापौर श्री बाबासाहेब वाकळे यांच्यासमवेत पाणीपुरवठा, जलसंधारण खात्याच्या अधिकार्यांची बैठक घेऊन शहरासाठी होणार्‍या पाणीपुरवठा बाबत व केंद्र सरकारच्या अमृत पेज योजनेबाबत  एक महत्वपूर्ण बैठक केल्याचे समजते.  
   महापौर श्री बाबासाहेब वाकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर शहराची पाण्याची गरज लक्षात घेता शहराला  मुळा धरणापासून ते पंपिंग स्टेशन  अधिक क्षमतेची  एक हजार मिलिमीटर व्यासाची नवीन पाईपलाईन बसवणे गरजेचे असून त्यामुळे नगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास बर्‍याच अंशी मदत होणार आहे. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही मात्र हे करत असताना संबंधित विभागाला या कामासाठी सुमारे दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा वेळ लागणार असून पुढील पंधरा दिवस म्हणजेच एकोणावीस जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून नागरिकांनी त्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आव्हान महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
   केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या या कामाचाआढावा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील घेत असून अहमदनगर  शहराच्या दृष्टीने ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण असून  योजनेच्या अंमलबजावणीत कडे सर्वांचे लक्ष लागून आहे . बहुचर्चित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर केंद्र सरकारच्या एकापाठोपाठ एक योजनांचा अंमलबजावणीकडे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील स्वतः लक्ष घालत आहेत. नगर शहरास दि18 जाने ते 30 जाने दरम्यान शहराला दोन, तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले
   याप्रसंगी महानगरपालिकेचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक रवींद्र बारस्कर, निखिल वारे, सतीश शिंदे, कराळे, उपायुक्त डॉ.  प्रदीप पठारे साहेब, पाणी पुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते साहेब , शहर अभियंता इथापे साहेब तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सतीश बडे, रोहिदास थोरात तसेच शोनन  इंजिनिअरिंगचे राजेंद्र पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment