प्रा. डॉ. स्वाती मुनोत यांना ग्लोबल टिचिंग एक्सेलेन्ट अवार्ड जाहिर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

प्रा. डॉ. स्वाती मुनोत यांना ग्लोबल टिचिंग एक्सेलेन्ट अवार्ड जाहिर

 प्रा. डॉ. स्वाती मुनोत यांना ग्लोबल टिचिंग एक्सेलेन्ट अवार्ड जाहिर


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः नुकतेच पंजाब  मधील चंदीगढ़ येथे शिक्षणक्षेत्रामधे उल्लेखनीय काम करणार्‍यांसाठी ॠढए- 2020 या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. किट्स इंटरनॅशनल व युवा इनोव्हेटर व बँडपावर यांच्याद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधे के. जी. महाविद्यालयाच्या परिसर संचालक प्रा. डॉ. स्वाती मुनोत यांना शिक्षण क्षेत्रामधील विशेष योगदानाबद्दल पारितोषिक देण्यात आले. या पुरस्कारामुळे संस्थेला पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवरील बहुमान प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त संचालक श्री. किशोर मुनोत यांनी दिली.
   भरतामधील विविध शिक्षणक्षेत्रा मधील कार्यरत व्यक्तिनि भारतामधील तरुणांसाठी व शिक्षणामधे खंड पडलेल्या विद्यार्थ्यांचा स्तर उंचावण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असणार्‍या व्यक्तिंची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. यासाठी किट्स क्राफ्ट संस्थेने संशोधन प्रक्रियेवर नामांकन प्रक्रिया पार पाडली. यामधे कृतिमुक्त अध्ययन पद्धती, विद्यार्थी विकास उपक्रम, विद्यार्थी समुपदेशन शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धन उपक्रम इ. ची दखल यामधे घेण्यात आली. या उपक्रमामधे देशातील 200 संस्था सहभागी झाल्या होत्या. याबद्दल डॉ. स्वाती मुनोत यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. हस्तिमलजी मुनोत, सचीव श्री. लालचंदजी मुनोत तसेच महाविद्यालयातील  डॉ. वर्षा कीर्तने, प्रा. आनंदमणि त्रिपाठी, प्रा. स्नेहल बोरावके, प्रा . विरेंद्र पाटील, प्रा. योगेश चाकोते अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment