अय्यप्पा स्वामींची शोभायात्रा साधेपणाने संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 20, 2021

अय्यप्पा स्वामींची शोभायात्रा साधेपणाने संपन्न

 अय्यप्पा स्वामींची शोभायात्रा साधेपणाने संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात 60 दिवसांच्या मकर वीलक्कु उत्सवात  अय्यप्पा स्वामीची शोभायात्रा(तालापोल्ली) संपन्न झाली अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली
   कोविड च्या पार्श्वभूमीवर , शासन नियमामुळे दरवर्षी संध्याकाळी श्रमिकनगर मधील बालाजी मंदिर ते अय्यप्पा मंदिर अशी सावेडीतून भव्य अय्यप्पा स्वामीची शोभायात्रा(तालापोल्ली)काढण्यात येते ती रद्द करून मंदिर परिसरात काढण्यात आलिया  यावेळी महिलानी मोती कलरच्या  साड्या परिधान करून हातात फुलांनी सजवलेली ताट व त्यामध्ये अर्धा नारळात दिवा ठेवला होता, पुरुष भाविक स्वामी शरणाम अय्यप्पा चा जयघोष करत होते . ही तालापोल्ली पाहण्यासाठी भाविक उपस्थित होते ,मंदीर परिसर फुलांनी व दिव्यांनी सजविण्यात आले होते.

No comments:

Post a Comment