जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल.

 जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल.

जिल्हा बँकेच्या कारभारात आता शिवसेना सक्रिय ः खा. लोखंडे

आ. मोनिका राजळे,आ. अरुणकाका जगताप, डॉ. चेतन लोखंडे, भगवान फुलसौंदर, वसंत लोढांनी उमेदवारी अर्ज भरले
“‘पाथर्डी तालुका सेवा संस्थेतील मतदानासाठी ठराव करण्यात आलेल्या 84 मतदारांपैकी 80 मतदार माझ्या बाजूने आहेत. त्यामुळे ही निवडणूक मी बिनविरोध जिंकू शकेल हा मला विश्वास आहे.                - आ. मोनिका राजळे


“राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आहे. राज्य सरकारच्या अनेक योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांपर्यंत पोहचविल्या जातात. ग्रामीण भागातील नागरिकांचा  शिवसेनेला पाठिंबा मिळत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेने भरघोस यश मिळविलेले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे.  
शशिकांत गाडे., जिल्हा दक्षिण प्रमुख शिवसेना
“नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये सहकारी पतसंस्थांचा 25 टक्क्यांहून अधिक सहभाग आहे. मात्र अद्याप सहकारी पतसंस्थांना जिल्हा बँकेमध्ये प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. हे प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी पतसंस्थांमधील उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.          
- काका कोयटे= अध्यक्ष. राज्य पतसंस्था फेडरेशन
नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आजच्या शेवटच्या दिवशी. आ. मोनिका राजळे, आ. अरुण काका जगताप, खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, भारतीय जनता पक्षाचे वसंत लोढा, शिवसेनेच्या सौ. अनिता गाडे, रामदास भोसले या दिग्गज नेत्यांनी अर्ज भरले.नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये कायमच शिवसेनेच्या-वतीने सहकार्य केले आहे. शेतकर्‍यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. त्यामुळे शिवसेनेने कधीही या बँकेबाबत राजकारण केले नाही. राज्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतही शिवसेनेचे संचालक असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या कारभारात आता शिवसेनाही सक्रीय आहे. त्यासाठीच आता शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. या उमेदवारांना अनेकांचे पाठबळ मिळणार असल्याने ते विजयी होतील, असा विश्वास शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.
   जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने खा.सदाशिव लोखंडे यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून, सौ.अनिता रमाकांत गाडे यांनी महिला राखीव मतदार संघातून, माजी महापौर भगवान फुलसौंदर इतर मागासवर्गीय मतदार संघातून तर पारनेर सेवा सोसायटी मतदार संघातून रामदास भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी दिग्वीजीय आहेर यांच्याकडे दाखल केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, जि.प.सदस्य संदेश कार्ले, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, अनिल शिंदे, संतोष गेनप्पा, गणेश कवडे, काशिनाथ दाते, दत्ता जाधव आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
    शेतकर्‍यांचे, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कायमच तत्पर असते. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले गेले. त्यामुळेच शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली होती. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा बँकेत शिवसेनेचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे, त्यासाठी या निवडणुकीत शिवसेना सक्रिय उतरली आहे.
    आ. मोनिका राजळे -  नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आ.मोनिका राजळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पाथर्डी तालुका सेवा संस्था मतदार संघातून त्यांनी अर्ज दाखल केला आहे. आ. मोनिका राजळेंचा अर्ज भरताना विष्णूपंत अकोलकर, खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष बर्डे, सुभाष केकाण, सुनिल परदेशी, शिवाजी मोहीते ,नगरसेवक नामदेव लबडे, सोमनाथ खेडकर, माणिक खेडकर, जमीर आतार, भगवान साठे, धनंजय बडे, संध्या आठरे, काशिबाई गोल्हार, मनिषा वायकर ,गोकूळ दौंड, सुनील ओहळ, बाबासाहेब ढाकणे, चारुदत्त वाघ, जे. बी. वांढेकर आदी उपस्थित होते.
    आ. अरुण जगताप - जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे बँकेचे विद्यमान संचालक अरुण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णयाधिकारी दिग्विजय आहेर यांच्याकडे दाखल केला. याप्रसंगी माजी आ. राहुल जगताप, आ. संग्राम जगताप, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष अर्जुन बोरुडे, सुनिल काळे, मनोज कुलकर्णी, मनेष साठे, अभिलाष घिगे, अतुल भंडारी आदी उपस्थित होते.
वसंत लोढा :- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी बिगर शेती मतदार संघातून नाशिक पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या उपस्थितीत निवडणुक निर्णय अधिकारी उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. वसंत लोढा यांचा अर्ज भरताना यावेळी स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरट, भाजपाचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, सचिन पारखी, अ‍ॅड.विवेक नाईक, महेश नामदे आदि उपस्थित होते.
    यावेळी वसंत लोढा म्हणाले, राज्यातील व जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन, स्थैर्यनिधी सहकारी संघ व नाशिक पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सातत्याने आंदोलनात्मक भुमिका घेऊन शासन दरबारी पाठपुरावठा करत आहेत. केलेल्या आंदोलनामुळे पतसंस्थांचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागले आहेत. जिल्हा बँक आणि सहकारी पतसंस्था यांचे अतुट नाते आहे. मात्र अद्याप जिल्हा बँकेमध्ये पतसंस्थांना एकदाही प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. यासाठीच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी करण्याचा निर्णय घेत बिगर शेती मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वसंत लोढा यांनी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती करुन उमेदवारी अर्ज दाखल केला.

No comments:

Post a Comment