पेन्शनधारकांना ईपीएफओचे आवाहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 22, 2021

पेन्शनधारकांना ईपीएफओचे आवाहन

 पेन्शनधारकांना ईपीएफओचे आवाहन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कर्मचारी भविष्य निधि संगठन भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाकडून ई.पी.एस. निवृत्ती वेतन प्राप्त करणारे सर्व निवृत्तीवेतन धारक यांना कोविड - 19 च्या साथीमुळे हयातीचा दाखला जमा करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2021 करण्यात आलेली आहे.  ह्या वर्षापासून हयातीचा दाखल्याची वैधता पुढील एक वर्षाकारिता वैध राहील. जानेवारी 2020 नंतर पेन्शन  नंबर जारी केलेले किंवा डिसेंबर 2019  रोजी किंवा नंतरचे हयातीचा दाखला मिळालेले पेन्शनधारक  यांना पूढील वर्षी त्या महिन्यात हयातीचा दाखला जमा करणे आवश्यक असल्याचे सहायक भविष्य निधि आयुक्त, जिल्हा कार्यालय, अहमदनगरचे सहायक आयुक्त अभिषेक कुमार मिश्र यांनी कळविले आहे.
   ज्या पेन्शन धारकानी हयातीचा दाखला मार्च 2020 ला बनविले होते त्या पेन्शन धारकांना हयातीचा दाखला मार्च 2021 ला बनवावे लागेल. ज्यांचे हयातीचा दाखले बनवायचे  आहेत त्यांनी त्यांच्या बँक शाखेत किंवा जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्र(सी.एस.सी) अथवा पोस्ट ऑफिस भेटून आवश्यक कार्यवाही करावी, असे कळविण्यात आले आहे.
   हयातीचा  दाखला बनविण्यासाठी पेन्शन धारकांचे आधारकार्ड, मोबाईल, पी.पी.ओ. नंबर आणि पेन्शन बँक पासबुक आदी आवश्यक आहे. डीजिटल जीवन प्रमाण यशस्वी झाल्यास कोणत्याही प्रकारचे दस्तावेज पी.एफ़ कार्यालयात पाठवने बंधनकारक नाही. कोविड-19 साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर तोंडावर मास्क वापर आणि शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करने आवश्यक आहे,  

No comments:

Post a Comment