केडगाव फेज 1 पाणी योजनेतून कल्याण रोड परिसरात पाणीपुरवठा करा : सचिन शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 22, 2021

केडगाव फेज 1 पाणी योजनेतून कल्याण रोड परिसरात पाणीपुरवठा करा : सचिन शिंदे

 केडगाव फेज 1 पाणी योजनेतून कल्याण रोड परिसरात पाणीपुरवठा करा : सचिन शिंदे

ड्रीम सिटीचे पाणी बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कल्याणरोड परिसर हा नगर शहराच्या अत्यंत जवळ आहे. त्यामुळे या परिसरामध्ये गेल्या 30 वर्षापासून मोठी वसाहत निर्माण झालेली आहे. परंतु महापालिकेने या भागासाठी विकासाच्या दृष्टिने कोणतेही ठोस असे पाऊल उचलले नाही. त्यातच या भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीरप्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कल्याण रोड परिसराच्या जवळच्या भागाला दिवसाआड पाणी मिळते. परंतु कल्याण रोडला 12-13 दिवसांनी तसाच भेदभाव हा केडगाव फेज 1 पाणी योजनेचा झाला आहे. नवीन झालेल्या ड्रीम सिटीसाठी 1 वर्षाच्या आत केडगाव फेज 1 द्वारे पाणी मिळते. परंतु कल्याण रोडला 25-30 वर्षांपासून वास्तव्यास असूनही पाणी मिळत नाही..? असा भेदभाव आमच्या सोबत का, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी विचारला आहे.
   या भागासाठी केडगाव फेज 1 पाणी योजनेतून पाणी देण्याचा पराक्रम महापालिका प्रशासनाने एवढी तत्पर सेवा कशी काय दिली. या पाठीमागे मोठी आर्थिक तडजोड झाली आहे. या बांधकाम व्यावसायिकांनी महापालिका प्रशासन व पदाधिकारी यांच्याशी आर्थिक तडजोड केली असल्यामुळे या भागाला पाणीपुरवठा सुरू करून दिला. तसेच केडगाव फेज 1 पाणी योजनेतून कल्याण रोड परिसरातील भागालाही लवकरात लवकर पाणीपुरवठ्याची सोय करुन द्यावी. अन्यथा ड्रीम सिटीचे पाणी बंद करावे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभे करू व फेज 1 पाणी योजनेतून कल्याण रोड परिसराला पाणी घेऊ, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment