दहा हजार पत्रे थोरातांना पाठविण्याचा मनसेचा संकल्प.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 5, 2021

दहा हजार पत्रे थोरातांना पाठविण्याचा मनसेचा संकल्प..

 छत्रपती संभाजी महाराज की जय...

दहा हजार पत्रे थोरातांना पाठविण्याचा मनसेचा संकल्प.

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः मतांच्या राजकारणासाठी जर काँग्रेस छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करत असेल आणी तो विरोध नगर जिल्ह्यातुन बाळासाहेब थोरात करीत असतील तर मनसे शांत बसणार नाही. हिन्दु धर्माचे दैवत छत्रपती संभाजी महाराज हे बाळासाहेब थोरातांच्या स्मरणात रहावे यासाठी व औरंगाबाद जिल्ह्यचे नाव बदलून संभाजी महाराज नगर करावे ह्या मागणीला केलेला विरोध बाळासाहेब थोरात यांनी मागे घ्यावा त्यासाठी मनसेच्या वतीने संभाजीनगर चे आमचे जिल्हा अध्यक्ष्य सुहास दशरते यानी जो 26 जानेवारी पर्यंत नामांतराचा अल्तिमेटम दिला. तो पर्यंत आज 5 जानेवारी पासुन मनसेच्या व जनतेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज कि जय असा जयघोष पोस्टकार्ड वर लिहुन जिल्ह्यातून जवलपास दहा हजार पत्र बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर च्या घरच्या पत्यावर पाठवणार असल्याची माहीती मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे.
    महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने औरंगाबाद चे नामांतर संभाजी नगर करा. अशी मागणी केली असुन त्या मागणीला मनसे नगर जिल्ह्याचा पाठिंबा आहे. हि मागणी जोर धरत असतांना  काँग्रेस चे प्रदेशअध्यक्ष्य तसेच राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजी महाराज नगर करायला काँग्रेस चा विरोध आहे अशी भुमिका घेतली असल्यामुळे जो महाराजांच्या नावाला विरोध करेल त्यांना महाराष्ट्र नवनिर्मान सेना सोडणार नाही. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल केले त्या औरंगजेबाच्या मागे काँग्रेस तसेच हे महाविकास आघाडी सरकार राहत असेल तर यांना सत्तेत राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरवात होणार आहे. या वेळी मनसेचे उपजिल्हाअध्यक्ष  मनोज राऊत, शहर अध्यक्ष गजेन्द्र राशिनकर तसेच अ‍ॅड अनिता दिगे, विनोद काकडे यांच्यासह सर्व मनसेचे पदाधिकारी आपल्या हाताने छत्रपती संभाजी महाराज कि जय असा जय घोष पोस्टकार्ड वर लिहुन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविणर आहेत.तरी सर्वानी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर व्हावे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सर्व हिंदु जनतेने सहभागी होउन पाठिंबा द्यावा असे अवाहन मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment