ओबीसीची जनगणना करुन समाजाच्या लोकसंख्येनुसार हक्क मिळावे : वडेट्टीवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

ओबीसीची जनगणना करुन समाजाच्या लोकसंख्येनुसार हक्क मिळावे : वडेट्टीवार

 ओबीसीची जनगणना करुन समाजाच्या लोकसंख्येनुसार हक्क मिळावे  : वडेट्टीवार

उत्स्फुर्त प्रतिसादात जालन्यात मोर्चा : नगरमधून उपस्थिती

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः ओबीसीची जनगणना करुन समाजाच्या लोकसंख्येनुसार हक्क मिळावे. 51 टक्के हा समाज असून, आजपर्यंत समाजाला हक्क प्राप्त नाही, अशी खंत राज्याचे बहुजन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. जालना शहरात ओबीसी समाजाच्या भव्य मोर्चा आयोजित केला होता, तत्पूर्वी ना.वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते.
   मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, असे स्पष्ट करुन मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, असे त्यांनी एका प्रश्नांला उत्तर देतांना सांगितले. ओबीसी समाज वर्षानुवर्षे वंचित असल्याने आज समाज जागृत झाला आहे. ओबीसी,व्हीजे, एन.टी, असे संयुक्त संघटन यानिमित्ताने राज्यात सुरु झाले आहे. या समाजाला न्याय हक्क प्राप्त करुन देणे यासाठी हा मोर्चा जालना आयोजित केला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
   यावेळी राज्य संघटनेचे  अध्यक्ष बाळासाहेब सानप, लक्ष्मण हाके, सोमनाथ काशिद, संघटनेचे नगर शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, फिरोज शफी खान, अभिजित कांबळे, राजेश सटाणकर आदि उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर नगरच्या शिष्टमंडळाने ना.वडेट्टीवार यांची भेट घेऊन नगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर संघटनेच्या कामाचा अहवाल दिला. शहरातील नवीन संघटन आणि वाटचाल यावर मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment