नवीन चारचाकी वाहनांकरिता पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 20, 2021

नवीन चारचाकी वाहनांकरिता पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 नवीन चारचाकी वाहनांकरिता पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः चारचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता दिनांक 27 जानेवारी, 2021 रोजी नवीन वाहन मालिका सुरु करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी दिनांक 20 जानेवारी ते 25 जानेवारी, 2021 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज चांदणी चौकातील नवीन इमारतीत खिडकी क्रमांक 19 येथे डिमांड ड्राफ्ट जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड (फोटो आयडी- भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल सह) जोडावा. पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट   ऊू.ठढज, -हाशवपरसरी  या नावाने काढावा. डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेचा असावा, स्टेट बँकेचा डिमांड ड्राफ्ट असल्यास सदर डिमांड ड्राफ्ट अहमदनगर कॅम्प ब्रॅच/ ट्रेझरी ब्रँच , कोड नं. 13296 करीता देय असावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी कळविले आहे.
   एकाच परंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकांची यादी दिनांक 25 जानेवारी 2021 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता चांदणी चौकातील नवीन इमारतीत प्रवेशव्दारावर प्रदर्शित करण्यात येईल. उपरोक्त यादीत असलेल्या पसंती क्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे अशाच अर्जदारांनी दिनांक 27 जानेवारी 2021 बुधवार रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठीच्या पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करुन खिडकी क्र. 19 येथे जमा करावा. एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन बंद सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा  डिमांड ड्राफ्ट धारकांनी दिनांक 27 जानेवारी 2021 सोमवार रोजी दुपारी 4.30 वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनाबाहेर उपस्थित रहावे.

No comments:

Post a Comment