रक्तदान मोहीम व्यापक होणे गरजेचे ः प्राचार्य कल्हापुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 15, 2021

रक्तदान मोहीम व्यापक होणे गरजेचे ः प्राचार्य कल्हापुरे

 रक्तदान मोहीम व्यापक होणे गरजेचे ः प्राचार्य कल्हापुरे

राष्ट्रीय युवा सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास युवकांचा प्रतिसाद

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः रक्तासाठी मनुष्य मनुष्यावर अवलंबून असल्याने रक्तदान मोहीम व्यापक होणे गरजेची आहे. रक्तही मानवी जीवनाला मिळालेली अमूल्य देणगी असून, रक्त कोणत्याही पध्दतीने कृत्रिमरित्या तयार होत नाही. कोरोनाच्या संकटकाळानंतर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर रक्तही मनुष्याच्या जीवनासाठी अत्यावश्यक बाब बनली असून, गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदानासाठी युवकांना पुढाकार घेण्याचे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी केले.
    नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा रुग्णालय, द युनिव्हर्सल फाऊंडेशन, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. युनिट, आय.सी.टी.सी. विभाग, शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरासह युवक-युवतींसाठी एड्स जनजागृती, निबंध चित्रकला, भिंतीपत्रक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य कल्हापुरे बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा.अरुण धनवट, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.नवनाथ आगळे, एन.सी.सी.चे प्रा. सुभाष आगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोहसीन बागवान, प्रा.डॉ.एम.बी. शेख, डॉ.डी.जे. सोनवणे, डॉ. मनोज पाल, डॉ. संध्या इंगोले-कवडे, सुनील हिरवे, गोकुळ गर्जे, विशाल जाधव, स्नेहल सावंत, अशोक पवार, नरेश पेवाल, मोहन पोकळे, शाहीर कान्हू सुंबे, युनिव्हर्सल फाऊंडेशनचे संचालक सागर अलचेट्टी, आदिती उंडे, शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानचे गणेश निमसे, वैभव धनगर, अविनाश गाडेकर, श्रावण कुटे, देवेंद्र थोरात, कुशल पवार आदी उपस्थित होते.
   प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात सागर अलचेट्टी यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी व युवकांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी या शिबीराचे आणि स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे स्पष्ट केले. शाहीर कान्हू सुंबे यांनी युवकांना सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन जगताना इतरांसाठी जगण्याचा पोवाड्यातून संदेश दिला. तर आपल्या शाहिरीतून रक्तदान व एड्सबद्दल जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नवनाथ आगळे यांनी केले. आभार मनोज पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, पोपट बनकर, अ‍ॅड. अनिता दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment