उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते शहरातील विकास कामांचे भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते शहरातील विकास कामांचे भूमिपूजन

 उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते शहरातील विकास कामांचे भूमिपूजन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा नगर पालिकेच्या शिवाजी चौक ते रोहिदास चौक रस्ता काँक्रीटीकरण व शिवाजी चौक ते दिल्ली वेस रस्ता काँक्रीटीकरणचे लोकार्पण तसेच, हनुमान नगर आणि शिवपार्वती सोसायटी मधील बगीचा सुशोभीकरण, वाचनालय इमारत दुरुस्ती, जावई नगर ते रेल्वे गेट खडीकरण, डांबरीकरण आदी विकास कामांचे भूमिपूजन शनिवार दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी 2 वा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.शुभांगी ताई पोटे व गटनेते मनोहर पोटे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त दादा तनपुरे हे भूषविणार आहेत.आ.बबनराव पाचपुते, मा. आ.राहुलदादा जगताप, रा.कॉ. प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जि.प. मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस, स.म.शिवाजीराव नागवडे सह.साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे उपस्थित राहणार आहेत.नमूद कामंशिवाय साळवण देवी रोड स्मशानभूमी विकसित करणे, गट नंबर 19, आरक्षण क्र. 42 हिंदू स्मशानभूमी विकसित करणे, न.पा. कार्यालय सभागृहात फर्निचर आदी कामांचा समावेश आहे.
सौ.शुभांगी ताई पोटे म्हणाल्या दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी आपण नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. पती नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या काळात सुरू असलेली कामे पूर्ण करून, नव्याने कामांचे प्रस्ताव पाठविले. परंतु, लोकसभा निवडणूक आचारसंहिता त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुक आचारसंहिता, कोरोना महामारीतील लॉकडाउन यामुळे बराच काळ गेला असला तरी, लॉकडाऊन काळात विकास कामाला परवानगी मिळताच सिमेंट रस्ते तातडीने हाती घेतले. शिवाय राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने माजी आमदार राहुल जगताप, रा.कॉ.प्रदेश उपाध्यक्ष,घनश्याम शेलार, जि.प.माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, दीपक भोसले यांच्या मदतीने मनोहर पोटे व आपण विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपये तर, जिल्हा नियोजनकडून 10 कोटिंचा निधी मंजूर करून आणला.याकामी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे, ना.शंकरराव गडाख, पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे यांनी प्राधान्याने श्रीगोंदा नगरपालिकेसाठी तातडीने निधी दिला. असे सांगून सौ.पोटे यांनी सुमारे 10 कोटी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यास यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a Comment