गणेगाव येथे विजयी मिरवणुक काढणार्‍या 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल; 20 जणांना अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 19, 2021

गणेगाव येथे विजयी मिरवणुक काढणार्‍या 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल; 20 जणांना अटक

 गणेगाव येथे विजयी मिरवणुक काढणार्‍या 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल; 20 जणांना अटक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
राहुरी ः ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबीवरून गुलाल उधळत, डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढणार्‍यांवर पोलिसांनी थेट कारवाई केली. याप्रकरणी 20 जणांना अटक झाली. 50 जणांवर गुन्हे दाखल झाले.
गणेगाव येथे भाजपने राष्ट्रवादीचा पराभव करीत सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय मिळविला. हा विजय साजरा करण्यासाठी सायंकाळी उमेदवारांची जेसीबीवरून मिरवणूक निघाली. डीजेचा आवाज घुमला . जेसीबीवरून गुलालाची उधळण सुरू झाली. याबाबत पोलिसांना माहिती समजताच, पोलिसांनी मिरवणूक बंद करण्याची विनंती केली; परंतु त्यांचे कोणीही मनावर घेतले नाही. याबाबत पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना कळविले. त्यांनी ही बाब पोलिस अधीक्षकांच्या कानावर घातली. मग पुढील सूत्रे हलली. दंगलनियंत्रक पथकाचे एक उपनिरीक्षक व 27 जणांचे पथक चार वाहनांतून गावात दाखल झाले .या दंगलनियंत्रण पथकाने जमावावर कारवाई केली. काठ्यांचा प्रसाद देखील दिला. यावेळी कार्यकर्त्यांना पळता भुई थोडी झाली. पथकाने भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भानगडे यांच्यासह 20 जणांना राहुरी पोलिस ठाण्यात आणले. 50 जणांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.

No comments:

Post a Comment