पतीला खांद्यावर घेऊन मिरवणूक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 19, 2021

पतीला खांद्यावर घेऊन मिरवणूक

 पतीला खांद्यावर घेऊन मिरवणूक


पुणे ः
पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत निवडणुकीत पती निवडून आल्यानंतर पत्नीने चक्क खांद्यावर उचलून पतीची मिरवणूक काढली. गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवले. या घवघवीत यशामागे महिलांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयाचा हटके जल्लोष केला. पती संतोष यांना खांद्यावर उचलून पत्नी रेणुकाने गावात आनंदाने मिरवणूक काढली.

No comments:

Post a Comment