भिस्तबाग रस्ता कामातील अडथळे दुर करा : नगरसेविका सोनाबाई शिंदे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 13, 2021

भिस्तबाग रस्ता कामातील अडथळे दुर करा : नगरसेविका सोनाबाई शिंदे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

 भिस्तबाग रस्ता कामातील अडथळे दुर करा : नगरसेविका सोनाबाई शिंदे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

अन्यथा आंदोलनाचा इशारा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सावेडी उपनगराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग महालापर्यंतच्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सदर रस्त्याचे काम आहे त्याच स्थितीत घाईघाईने उरकण्याचा प्रयत्न झाल्यास कोटयावधी रुपये खर्चुन तयार होत असलेल्या या रस्त्याचा काहीच उपयोग होणार नाही, परिणामी सर्व खर्च वाया जाणार आहे. हा रस्ता मॉडेल रस्ता व्हावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे सदर रस्त्यास अडथळा ठरणारे वीजेचे खांब, रोहित्र, अतिक्रमणे, धोकादायक झाडे तात्काळ काढण्यात यावीत अशी मागणी नगरसेविका सोनाबाई शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत तायगा शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन रस्ता कामातील समस्या निदर्शनास आणून दिल्या. सदर समस्यांचे तात्काळ निवारण न झाल्यास प्रभाग क्र पाचचे नगरसेवक दि. 18 रोजी रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती आ.संग्राम जगताप, जिल्हा पोलिस अधिक्षक, उपायुक्त- अहमदनगर महानगरपालिका, तोफखाना पोलिस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment