व्हीआरडीई स्थलांतरणाबाबत खा.सदाशिव लोखंडे यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 11, 2021

व्हीआरडीई स्थलांतरणाबाबत खा.सदाशिव लोखंडे यांना निवेदन

 व्हीआरडीई स्थलांतरणाबाबत खा.सदाशिव लोखंडे यांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरमधील व्हीआरडीई स्थलांतराच्या प्रयत्नाबाबत येथील अधिकारी व कर्मचार्यांनी शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे हे नगर येथे आले असता त्यांची भेट घेऊन स्थलांतर थांबवावे, अशी विनंती नगरमधील व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी दुर्गेश गाडेकर, एम.जाधव, पी.जी. गवळी, के.बी. करोसिया आदिंसह शहरप्रमुख दिलीप सातपुते उपस्थित होते.
याप्रसंगी खा.सदाशिव लोखंडे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून सदर स्थलांतराणाबाबत आपण दिल्ली येथील भाजपाचे वरिष्ठ नेते शाम जाजू यांची भेट घेऊन त्यांच्यासह संरणक्षमंत्री ना.राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यापुढे मांडू.  शाम जाजू हे नगरचेच असल्याने ते या प्रश्नांबाबत सहनभूतीपूर्वक विचार करतील. तसेच महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदारांसह याबाबत  गांभीर्याने विचार करुन स्थलांतरणास स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी दुर्गेश गाडेकर यांनी खा. लोखंडे यांना व्हीआरडीई संदर्भात माहिती देतांना सांगितले की, वरिष्ठ पातळीवरुन व्हीआरडीई हलविण्याचे दिलेले संकेत हे नगरकरांसाठी मोठे हानिकारक ठरेल, त्याचप्रमाणे नगरमधून मोठा रोजगार स्थलांतरीत होईल. नगरच्या औद्योगिक विकासाला खीळ बसणारा आहे. स्थानिक व्यवसायिकांना फटका बसेल, त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थावरही परिणाम होईल. एकदरीत नगरच्या बाजारपेठेवर विपरित परिणाम होईल. गेल्या 20-25 वर्षांपासून संस्थेत काम करणारे नगरमध्येच स्थायिक झाले असल्याने कौटूंबिक वाताहात होईल. अहमदनगरचे आर्थिक, सामाजिक व मानसिक नुकसान थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. याबाबत शिष्टमंडळाने शिवसेना खासदार व संरक्षण समितीचे सदस्य श्रीकांत शिंदे यांनाही याबाबत निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment