खेळातून खेळाडूची प्रतिष्ठा निर्माण होते ः आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

खेळातून खेळाडूची प्रतिष्ठा निर्माण होते ः आ. संग्राम जगताप

 खेळातून खेळाडूची प्रतिष्ठा निर्माण होते ः आ. संग्राम जगताप

जनता आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित मनपा स्थायी समिती सभापती मॅरेथॉन चषकाचे आयोजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्व दिले पाहिजे. खेळामध्येही आजच्या विद्यार्थ्यांला आपले करिअर करण्याची संधी उपलब्ध आहेत. मेहनत, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर यश संपादन करता येते. विविध संस्था, मित्र मंडळ, यांनी पुढाकार घेवून आपआपल्या भागामध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना खेळाचे व्यासपीठ निर्माण करून देवून त्यांना योग्य मागर्दर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास खेळाडू आपआपल्या खेळामध्ये यश प्राप्त करू शकतो. खेळाच्या माध्यमातून आपल्या गावाचे, राज्याचे व देशाचे नांव उज्वल होते. खेळाडूची प्रतिष्ठा निर्माण होते. अजित कोतकर यांनी खेळाडूंसाठी मनपा स्थायी समिती सभापती मॅरेथॉन चषक भरून खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून दिले. प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम करावे असे प्रतिपादन आ. संग्रामभैय्या जगताप यांनी केले.
जनता आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित मनपा स्थायी समिती सभापती मॅरेथॉन चषकाचे उदघाटन आ. संग्रामभैय्या जगताप यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, माजी नगरसेवक संजय चोपडा, सुनिल कोतकर, सुनिलमामा कोतकर, संभाजी पवार, कोंडीराम विरकर, बच्चन कोतकर, बाळासाहेब आंधळे, भूषण गुंड, मोहन औटी, जगन्नाथ चेमटे, अनिल ठुबे, सुखदेव गुंड, बाजीराव येवले, बाळासाहेब हराळ, महादेव कोतकर, सोन्याबापू घेबूड, मा.श्री.अशोक गुंड, जालिंदर कोतकर, बाबा कोतकर, उमेश सुंबे, महेश दळवी, मोहन औटी, हरिदास कोतकर, सुनिल ठुबे, भाऊ तापकिरे, ओंकार कोतकर, चिकु कोतकर, भैरू कोतकर, मा.श्री.सोमा कोतकर, मा.श्री.भाऊ रामदास कोतकर, आदी उपस्थित होते.
यावेळी स्थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर म्हणाले की, खेळाडूंना खेळण्यासाठी क्रीडांगणे निर्माण करण्याची गरज आहे. मनपाच्या माध्यमातून विविध स्पर्धेचे आयोजन करून जनता आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सभापती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून दिले. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी मैदानी खेळापासून लांब चालला आहे. दिवसरात्र तो मोबाईलमध्ये व्यस्त असतो. शालेय शिक्षणाबरोबर खेळालाही तितकेच महत्व दयावे असे ते म्हणाले.
यावेळी मा.श्री.अजित कोतकर म्हणाले की, जनता आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सभापती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन लहान व मोठया अशा दोन गटामध्ये करण्यात आले या स्पर्धेमध्ये जिल्हयाबरोबर इतर जिल्हयातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. सुमारे दोन हजार खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. लहान गटामध्ये आदिल्य गोरे, युवराज भापकर, वरून बनसोडे, रोहन आवारे घनश्याम झिने यांनी यश संपादन केले. तसेच मोठया गटामध्ये श्रीकांत जाधव, भाऊ ठोंबरे, सचिन गायखे, आकाश गोरे व ईश्वर पाठक यांनी यश संपादन केले.

No comments:

Post a Comment