बोटिंग सुरु झाल्याने ‘साईबन’मध्ये पर्यटकांची संख्या वाढली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

बोटिंग सुरु झाल्याने ‘साईबन’मध्ये पर्यटकांची संख्या वाढली

 बोटिंग सुरु झाल्याने ‘साईबन’मध्ये पर्यटकांची संख्या वाढली


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोविड मुळे गेली 9 महिने बंद असलेली बोटिंग शासनाने परवानगी दिल्यानंतर  नगरमधील एमआयडीसीच्या मागे असणार्या साईबन कृषी पर्यटन केंद्रात सध्या रोज बोटिंग साठी  गर्दी होत असून येथील बंधार्यात चांगले पाणी आहे त्यामुळे साईबनमध्ये सध्या रोज पर्यटकाची व नगरकराची गर्दी होत आहे,साईबन मधील तलावात बोटिंगची सोय आहे त्यामुळे नगरकरांना अगदी जवळ बोटिंगचा आनंदहि मिळत आहे.तसे नौकाविहार करणे सर्वांनाच आवडते तसे प्राणी पक्षी हि पाणी पिण्यासाठी येथे येतात त्याचे दर्शन हि या ठिकाणी होते
नगर शहराच्या जवळ तशी पण कोठे बोटिंगची सोय नाही.नगरमध्ये येणारे पाहुणे,पर्यटक एक दिवसासाठी साईबनमध्ये भेट देतात व बोटिंग बरोबर इतरही खेळाचा आनंद घेतात.साईबानच्या तलावात विहंग्णार्‍या बोटींची सफर हे आत्ता सगळ्याचे आकर्षण ठरलेले आहे,पर्यटकांना बोटिंगसाठी लाईफ गार्ड जॅकेट दिले जाते तसेच सुरक्षारक्षक पण येथे असतात,
साईबनमध्ये सध्या हुरडा पार्टी चालू असून त्यासाठी हि रोज गर्दी होत आहे,तसेच पपेट शो आणि उंटाची गाडी हे एक विशेष आकर्षण आहे.डोनाल्ड डक,मिकी माउस,व अलिबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या,त्याच्या बाजूने जाणारया रेल्वे गाडीचा कर्कश आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत, जुन्या नव्या गाण्यांची रेलचेल हे सर्व आकर्षित काणारे आहेत
म्हणूनच नगर जिल्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक परिवार स्नेही मोठ्या संख्येने साईबानला येत आहेत निसर्गरम्य असणारे वातावरण तसेच झाडी व शुद्ध हवा यामुळे मन प्रसन्न राहते.

No comments:

Post a Comment