डोंगरगणला जंगले महाराजांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 11, 2021

डोंगरगणला जंगले महाराजांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

 डोंगरगणला जंगले महाराजांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः डोंगरगण येथील ज्ञानेश योग आश्रम संस्थेत गुरुवर्य हभप जंगले महाराज शास्त्रींजीच्या हस्ते इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सुफला एकादशी निमित्त गीता पाठाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी.एस.एन.एल.चे सेवानिवृत्त श्री व सौ.प्रगती सुधाकर पवार यांनी 2021 वर्षाचे कॅलेंडर वारकरी सांप्रदायातील, दिंडीतील सेवेकरी, गीता पाठातील शिष्यवृंद आदिंसाठी स्व:खर्चाने काढले. त्याचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी इंजि.अनिल साळूंखे, सुषमा साळूंखे, राधाकिसन भुतकर, बाळासाहेब खेत्री, प्रतिक पवार, सुयोग पवार, आदिंसह भाविक उपस्थित होते. यावेळी हभप भागवत महाराज जंगले, हभप चंद्रकांत महाराज मोहिते यांनी पवार दापत्यांनी काढलेल्या दिनदर्शिकेचे कौतुक करुन सर्व सदस्यांना चांगला उपयोग होईल, असे सांगितले.

No comments:

Post a Comment