कामरगावात माजी सैनिक व कुटुंबीय ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 11, 2021

कामरगावात माजी सैनिक व कुटुंबीय ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

 कामरगावात माजी सैनिक व कुटुंबीय ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

भ्रष्टाचार मुक्ती व परिवर्तनाचा नारा देत जय जवान, जय किसान पॅनलची निर्मिती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगत मध्ये आली असताना, निवडणुक अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. कामरगाव (ता. नगर) मध्ये माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत भ्रष्टाचार मुक्ती व परिवर्तनाचा नारा देत जय जवान, जय किसान पॅनलची निर्मिती केली. तर विकासाच्या मुद्दयांवर प्रस्थापितां-विरोधात शड्डू ठोकला आहे. गावातील सेवानिवृत्त सुभेदार प्रकाश ठोकळ यांनी या पॅनलची निर्मिती केली. या पॅनलमध्ये तुकाराम कातोरे, विमल सोनवणे, मंगल साठे, संदीप ढवळे, आशाबाई ठोकळ, पुजा लष्करे, अलका ठोकळ, अश्विनी ठोकळ, हिरामण शिंदे, अनिल आंधळे, कामिनी ठोकळ या माजी सैनिक, सैनिक कुटुंबातील सदस्य व शेतकरी यांना संधी देण्यात आली आहे. सुशिक्षित, युवा व सामाजिक कार्याची जाण असलेले उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणुक अटीतटीची होणार आहे.


No comments:

Post a Comment