कोट्यावधी रुपयांची पदरमोड करून विकासकामे मार्गी लावणारा खरा समाजसेवक रमेश आजबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 8, 2021

कोट्यावधी रुपयांची पदरमोड करून विकासकामे मार्गी लावणारा खरा समाजसेवक रमेश आजबे

 कोट्यावधी रुपयांची पदरमोड करून विकासकामे मार्गी लावणारा खरा समाजसेवक रमेश आजबे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः मंदिरांचा जिर्णोद्धार, शाळांमध्ये एलईडी प्रोजेक्टर, लोकांसाठी रस्ते, गटारे, रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक, पाण्याची सोय, परिसरात वृक्षारोपण करून संरक्षक जाळी बसवून उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा, मोफत उपचार करणार्‍या आरोळे कोविड सेंटरला गहू व तांदुळाचा तसेच लाखो रुपयांचा ऑक्सिजन पुरवठा शासकीय कार्यालयात रिक्षा चालक, हमाल पंचायत व कोविड सेंटरला मोफत मास्कचे व सॅनिटायझरचे वाटप सार्वजनिक ठिकाणी कुपनलिका घेऊन पाणीपुरवठ्याची सोय अशा प्रकारे सावळेश्वर उद्योग समूहाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये पदरमोड करून रमेश आजबे समाजसेवा करणारा खरा समाजसेवक आहे.

आपल्या सावळेश्वर उद्योग समूहाच्या वतीने सारोळा गावात रमेश आजबे यांनी गावचे ग्रामदैवत सावळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला व गावातील हनुमान मंदिराचे अपुर्ण असलेले स्लॅब चे काम पूर्ण केले. तसेच गावातील मुलांना शैक्षणिक फायदा व्हावा म्हणुन जिल्हा परिषद शाळेला एलईडी प्रोजेक्टर दिला
स्वतःच्या गावात जसे काम केले तसेच मामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने संकल्प केला व झिक्री गावात दहा लाख रुपये खर्च करून हनुमान मंदिर जिर्णोद्धार केले व परिसरात पन्नास ब्रास पेव्हिंग ब्लॉक बसवून सुशोभीकरण केले, जिल्हा परिषद शाळेसाठी व ग्रामपंचायत साठी रंग दिला, शाळेतील मुलांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शाळेत कुपनलिका घेऊन दिली. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कुसडगाव जिल्हा परिषद शाळेसाठी होम थेअटर बसवून दिला.
शहरातील खाडे नगर भागात उघड्यावरील गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन लोकांना दुर्गंधीचा त्रास होत होता. तेव्हा भुमीगत गटार करून सिमेंट नळ्या टाकुन रस्त्यावर मुरूम टाकला यामुळे परिसरातील लोकांची सोय झाली. तसेच बीड रोड ते ल. ना. होशिंग विद्यालय रस्ता गेल्या चाळीस वर्षांपासून बंद होता त्यामुळे मुलांना एक किलोमीटर वळसा घालून जावे लागत होते. तेव्हा आजबे यांनी हा रस्ता मोकळा केला व रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक टाकले तसेच पुढे जामखेड महाविद्यालय पर्यंत रस्ता तयार केला. यामुळे सुमारे पाच हजार मुलांची सोय झाली. यासाठी सुमारे अडीच तीन लाख रुपये पदरमोड केली.
तसेच ल. ना. होशिंग प्रवेशद्वार ते तहसिल रोडपर्यंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले व झाडांना संरक्षक जाळी बसवली व झाडांना उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला. यामुळे आता या झाडांनी चांगले बाळसे धरले आहे व आता परिसर हिरवागार झालेला आहे. दत्त कॉलनी परिसरात सिमेंट पाईप टाकून भुमीगत गटार बांधली.
ग्रामीण रुग्णालयात रूग्णांचे व बरोबर येणार्‍या नातेवाईकांचे पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते हे लक्षात घेऊन रूग्णालय परिसरात कुपनलिका घेऊन त्यावर विद्युत मोटार बसवली रूग्णांची व नातेवाईकांची पिण्याच्या पाण्याची सोय केली. तसेच रूग्णालय परिसर स्वच्छ करून घेतला. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती समोर जुने बसस्थानक ते नवीन बस स्थानक परिसरात सुमारे शंभर झाडे लावली व संरक्षक जाळी बसवली तसेच कोल्हेवाडी येथे शंभर वडाचे झाडे लावली, शहरासह ग्रामीण भागात सुमारे पंचवीस हजार मास्कचे वाटप केले. शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालय, आरोळे कोविड सेंटर, हमाल पंचायत, रिक्षा युनियन यांना मास्क व सॅनिटायझर वाटप केले. आरोळे कोविड सेंटरला एक महिना पुरेल एवढे ऑक्सिजन सिलेंडर व दहा क्विंटल गहू व दहा क्विंटल तांदूळ दिला.
जांबवाडी जिल्हा परिषद शाळेचे एक एकर परिसर सुमारे तीनशे हैवा टिपर टाकून सपाटीकरण केले जांबवाडी ते मातकुळी या रस्त्यावर दोनशे हैवा टिपर टाकून रस्ता केला जामखेड स्मशानभूमी ते जांबवाडी रस्त्यावर घरात जाण्यासाठी सिमेंट नळी व हैवा टिपर मुरूम टाकुन प्रत्येक घरासाठी रस्ता तयार केला. काटकर वस्ती ते नगर रोड रस्ता स्वखर्चाने केला.
प्रभाग क्रमांक पाच खडकवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नव्हता तेव्हा पदरमोड करून रस्ता तयार केला व मुरमीकरण करत रस्त्यावर लाईटची व्यवस्था केली.
दरवर्षी संविधान दिन व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर लोक जमा होतात या सर्व लोकांची पाण्याची व जेवणची सोय आजबे हे करतात.
अशा प्रकारे रस्ते, पाणी, वृक्षारोपण, गोरगरिबांना मदत शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एलईडी प्रोजेक्टर, होमथेअटर, कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर व गहू तांदुळ मदत, मास्क व सॅनिटायझर वाटप, मंदिर जिर्णोद्धार, रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक, सार्वजनिक ठिकाणी रस्ता गटारे व पिण्याच्या पाण्यासाठी कुपनलिका अशी कोट्यावधी रुपयांची पदरमोड करून सावळेश्वर उद्योग समूहातर्फे सामाजिक कामे करणारा रमेश आजबे हा खरा समाजसेवा करणारा अवलिया आहे.

No comments:

Post a Comment