मुदतठेवीचे पैसे न देता दोन लाखांची फसवणूक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

मुदतठेवीचे पैसे न देता दोन लाखांची फसवणूक

 मुदतठेवीचे पैसे न देता दोन लाखांची फसवणूक

वि. दा. सावरकर मल्टीस्टेटच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः 
मुदत ठेवीवरील अकर्षक व्याजदर व परतावा देण्याचे अमिष दाखवून मुदतठेवीवरील दोन लाख रुपये परत न देता फसवणूक केल्या प्रकरणी वि. दा. सावरकर मल्टीस्टेट को, सोसायटी शाखा जामखेड च्या मॅनेजिंग डायरेक्टर सह एकुण पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शाखा मॅनेजर वैभव रघुवीर देशमुख, कॅशियर विकास नानासाहेब कुलकर्णी, क्लार्क शेखर प्रमोद वायभट तीघे रा. जामखेड , मॅनेजिंग डायरेक्टर प्रमोद बालाजी निमसे व गणेश शंकर थोरात दोघे रा. केडगाव, अहमदनगर अशा एकुण पाच जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फीर्यादी उमेश विठ्ठल देशमुख रा. जामखेड यांनी आपल्या फीर्यादीत म्हंटले आहे की दोन वर्षापूर्वी जामखेड शहरात वि. दा. सावरकर मल्टीस्टेट को ऑफ सोसायटी ची शाखा सुरू झाली होती. या शाखेत 2018 साली पासुन मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदरासह परतावा देण्याची जाहीरात आली होती. या जाहिराती मध्ये पैशाच्या ठेवीवर अकर्षक व्याजदर व परतावा देण्याचे ठरले होते. यामुळे फीर्यादी उमेश देशमुख यांनी या शाखेत दोन लाख रुपये 13 महीन्यांच्या मुदतीवर फीक्स डीपॉझीट ठेवले होते. याची मुदत संपल्यानंतर फीर्यादी हे बँकेत पैसै आणण्यासाठी गेले आसता सदर ची बँक दिवाळखोरी मध्ये निघाली आहे असे बँकेतील कर्मचार्यांन कडुन समजले. वेळोवेळी पैशाची मागणी करुनही संबंधित बँकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांन कडुन फीर्यादीस पैसै मिळेले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फीर्यादी यांच्या लक्षात आले. त्यामुळे फीर्यादी यांनी दि 21 रोजी जामखेड पोलिस स्टेशनला या प्रकरणी फीर्याद दाखल केली आहे. त्यानुसार वि दा सावरकर मल्टीस्टेट को ऑफ सोसायटी चे मॅनेजिंग डायरेक्ट सह एकुण पाच जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment