शिव पाणंद शेतरस्त्याच्या "आवाज दो"आंदोलनाला राज्यव्यापी करा : अण्णा हजारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

शिव पाणंद शेतरस्त्याच्या "आवाज दो"आंदोलनाला राज्यव्यापी करा : अण्णा हजारे

 शिव पाणंद शेतरस्त्याच्या "आवाज दो"आंदोलनाला राज्यव्यापी करा : अण्णा हजारे

आण्णा हजारेंच्या भेटीनंतर शिव पाणंद कृती समितीचे पालकमंत्र्यांना पत्र



नगरी दवंडी


पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी शिव पाणंद शेतरस्ते नवनिर्माण व राळेगणसिद्धीच्या पाझर तलाव बंधार्‍यावरील प्लॅस्टिक पेपर अस्तरीकरणाचा प्रयोग गावोगावी राबवला जावा यासाठी शेतरस्ते पिडीत शेतकर्‍यांनी एकत्र जनजागृती करत आवाज दो आंदलन उभे केले असुन प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाण्यासह गावोगावच्या पाझर तलावांची पाहणी सुरु केली असताना जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारेंनी राळेगणसिद्धीतील प्रत्यक्ष पाहणी करत आण्णांनी यावेळी शिव पाणंद कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले व आवाज दो आंदोलनाला राज्यव्यापी करा मी तुमच्या पाठीशी आहे अशा स्वरुपात मनोबल वाढवत पाठिंबा पदाधिकार्‍यांसह आंदोलनाला दिला, आण्णांच्या भेटीनंतर पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांसह कृषी,जलसंधारण आदी विभागांना विविध शेतरस्त्यांसह,प्लॅस्टीक पेपर अस्तरीकरणाचा टँकरमुक्तीच्या राळेगणसिद्धीच्या उपक्रमासह विविध विषयांची शेतकर्‍यांच्या जीवनाचा संघर्ष संपवण्यासाठी मागणी पत्राद्वारे करण्यात आली जर प्राशासणाने पत्राल लवकर न्याय दिल्यास आचारसंहीता संपताच पुढची दिशा ठरवु असे शिव पाणंद शेतरस्ते कृती समीतीचे शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी शिवपाणंद कृती समीतीचे शरद पवळे,संजय कनिच्छे,रघुनाथ कुलकर्णी,सुर्यकांत सालके, जाधव,राजेंद्र कारखिले,विजयसिंह मल्लाव,दिपक थोरात,निलेश आबुज यावेळी उपस्थित होते.

चौकट : मी सैन्यातुन सेवानिवृत्ती  घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत अनेक पदांच्या संंधी आल्या परंतु मी पदाच्या मागे धावलो नाही त्यामुळे मी जो आनंद अनुभवतो तो खुप मोठा आहे त्यासाठी तुम्ही पदाची अपेक्षा न ठेवता तुम्ही शेतकर्‍यांसाठी सुरु केलेले आंदोलन राज्यव्यापी करा मी तुमच्या पाठीशी आहे असे शिव पाणद कृती समितीच्या सभासदांना संभोदताना आण्णा हजारेंनी सांगितले.

No comments:

Post a Comment