अत्याधुनिक उपचारांमुळे रूग्णाला लवकर दिलासा : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 19, 2020

अत्याधुनिक उपचारांमुळे रूग्णाला लवकर दिलासा : आ. जगताप

 अत्याधुनिक उपचारांमुळे रूग्णाला लवकर दिलासा : आ. जगताप

डॉ.सांगळे यांच्या माऊली संधिवात क्लिनिकचा शुभारंभ व पायोनियर सोनोग्राफी सेंटरचे स्थलांतर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर - संधीवाता-सारख्या आजारात रूग्णाला मोठा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी रूग्णांना चांगले वैद्यकीय उपचार व मार्गदर्शन अत्यावश्यक असतात. नगरमध्ये विविध आजारांवर स्पेशालिस्ट डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे. यात आता संधीवातावरही माऊली क्लिनिकमधून अद्ययावत उपचार मिळणार आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. रूग्णांसाठी महत्त्वाची असलेली आपुलकीची आरोग्यसेवा देण्यात माऊली क्लिनिक निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
नगरच्या सावेडी परिसरात गॅलॅक्सी हॉस्पिटलशेजारी डॉ.विद्या बांगर-सांगळे यांच्या माऊली संधीवात क्लिनिकचा शुभारंभ तसेच पायोनियर सोनोग्राफी व एक्स रे सेंटरचे स्थलांतर झाले आहे. या क्लिनिकच्या शुभारंभप्रसंगी आ.जगताप बोलत होते. सोशल डिन्स्टन्सिंगचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमास नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया पाटील, अमोल गाडे, नंदा सांगळे, लक्ष्मण सांगळे, डॉ.अभिजीत सांगळे, डा.विद्या बांगर-सांगळे उपस्थित होत्या. आ.निलेश लंके, सभापती राहुल झावरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे आदींनी शुभारंभानिमित्त माऊली संधिवात क्लिनिकला भेट देवून डॉ.सांगळे यांना शुभेच्छा दिल्या.
संधीवात तज्ज्ञ डॉ.विद्या बांगर-सांगळे यांनी सांगितले की, मी संधीवात स्पेशालिटीचा अभ्यास आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या वेल्लोर येथील कॉलेजमध्ये केला. दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर आता नगरमध्ये संधीवात क्लिनिक सुरु केले आहे. याठिकाणी संधीवात रूग्णांना सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. आमवात, संधीवात, गाऊट, लुपस, हाडांचा ठिसूळपणा, गर्भपणातील संधिवात, लहान मुलांमधील संधिवात आदी समस्यांचे अचूक निदान व परिणामकारक उपचार याठिकाणी रूग्णांना मिळतील.
रेडिओलॉजीस्ट डॉ.अभिजीत सांगळे यांनी सांगितले की, मागील चार वर्षांपासून दिल्लीगेट येथे पायोनियर सोनोग्राफी, एक्स रे सेंटर, कलर डॉपलर सेंटर चालवत होतो. अत्याधुनिक मशिनरीमुळे अचूक निदान येथे केले जाते. आता रूग्णांच्या सोयीसाठी नवीन प्रशस्त जागेत सेंटरचे स्थलांतर केले असून याठिकाणी थ्रीडी, फोर डी अल्ट्रासाउंडसह अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आल्या आहेत. याशिवाय संधीवातासाठीचे स्वतंत्र परिपूर्ण क्लिनिक याठिकाणी असून रूग्णांना याचा चांगला लाभ होईल.  

No comments:

Post a Comment