समाज घडविणार्‍या शिक्षकांची मुलेदेखील विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे ः बोडखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

समाज घडविणार्‍या शिक्षकांची मुलेदेखील विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे ः बोडखे

 समाज घडविणार्‍या शिक्षकांची मुलेदेखील विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे ः बोडखे
वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेतून बीडीएससाठी निवड झाल्याबद्दल ऋतुजा थोरात हिचा गौरव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेतून ऋतुजा सोमनाथ थोरात या विद्यार्थिनीची लोणी येथील प्रवरा मेडीकल कॉलेजला बीडीएससाठी निवड झाल्याबद्दल तीचा गौरव करण्यात आला. शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे व माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे यांनी थोरात हिचा सत्कार केला. यावेळी जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, दिलीप डोंगरे, मुख्याध्यापक कानवडे सर, उमेश गुंजाळ, जेष्ठ मार्गदर्शक मारुती लांडगे, भाऊसाहेब थोटे, सोमनाथ थोरात आदि उपस्थित होते.  
अध्यापक असलेले सोमनाथ थोरात यांची ऋतुजा ही कन्या असून, नुकतेच तिने हे यश संपादन केले आहे. समाज घडविण्याचे कार्य करणार्या शिक्षकांची मुले देखील विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. अशा गुणवंत मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले. आप्पासाहेब शिंदे यांनी ऋतुजा थोरात हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षक व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने हे यश प्राप्त केले असून, सामाजिक भावनेने गोर-गरीबांची सेवा करण्यासाठी वैद्यकिय क्षेत्र निवडल्याचे ऋतुजा थोरात हिने सांगितले.

No comments:

Post a Comment