मराठा उद्योजक लॉबीतर्फे महाराष्ट्रात महारक्तदान शिबीर संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

मराठा उद्योजक लॉबीतर्फे महाराष्ट्रात महारक्तदान शिबीर संपन्न

 मराठा उद्योजक लॉबीतर्फे महाराष्ट्रात महारक्तदान शिबीर संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः मराठा उद्योजक लॉबी परिवाराने आरोग्यमंञी  राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 27 डिसेंबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. राज्यातील वेगवेगळ्या जिल्हयात मिळून जवळपास 1000 बॅग जमा झाल्यात. यापैकी नगर जिल्हयात  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. नगरमध्ये सुमारे 177 जणांनी रक्तदान केले.
     कोरोना काळात रक्ताच्या तुटवड्याची गरज भासत असल्याने शिबिराचे आयोजन केले होते. नगरला सिव्हिल हॉस्पिटल , पारनेरला ओंकार हॉस्पिटल, पाथर्डी, तिसगाव, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता येथे शिबिर पार पडले. सर्व ठिकाणी  छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून शिबिराचे उद्घाटन झाले होते. ब्रँड म्बेसेडर म्हणुन सौम्या संदीप खरमाळे यांनी काम पाहिले. त्यांचे टीमच्यावतीने कौतुक करण्यात आले.
     जिल्ह्याच्या शिबिरासाठी मा. नवनाथ धुमाळ, संतोष कुटे, राजेंद्र औताडे, सुरज गट, महेश आठरे, अशोक कुटे, प्रसाद बानकर, सुनील गावडे , राहुल आढाव, अंकित रहाणे, अभय शेंडगे, डॉ मयुरेश कुटे, अजिंक्य गुळवे, प्रमोद झावरे, अभय शेंडगे, प्रकाश पवार, संदीप खरमाळे, योगेश कटारे, जयश्री चोभे, हिरा औटी, स्मिता इथापे, दिपाली जेवे-खरमाळे,  यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment