नगरच्या स्नेहा देशमुख ठरल्या झी मराठीवरील ‘डान्सिंग क्विन’च्या उपविजेत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

नगरच्या स्नेहा देशमुख ठरल्या झी मराठीवरील ‘डान्सिंग क्विन’च्या उपविजेत्या

 नगरच्या स्नेहा देशमुख ठरल्या झी मराठीवरील ‘डान्सिंग क्विन’च्या उपविजेत्या


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  नगरच्या स्नेहा देशमुख यांनी झी मराठी वाहिनीवरील डान्सिंग क्विन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत उपविजेतेपद पटकावले आहे. रविवारी सायंकाळी या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा झाला. यात देशमुख यांनी व्दितीय क्रमांकाचे बक्षिस मिळवून नगरची मान उंचावली आहे. तिला एक लाख रुपयांचा धनादेश तसेच नामांकित कंपन्यांचे गिफ्ट व्हाउचर्स मिळाले. वजनदार डान्सिंग क्विन स्पर्धेत मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर आदी शहरातील मुलींनी सहभाग घेतला होता. सप्टेंबर पासून जवळपास 13 ते 14 आठवडे ही स्पर्धा चालली. यात प्रत्येक फेरीत वेगवेगळे नृत्याविष्कार सादर करीत देशमुख यांनी परीक्षकांकडून वाहवा मिळवली व त्या अंतिम 6 स्पर्धकांमध्ये पोहचल्या. दि.27 डिसेंबर रोजी महाअंतिम फेरीतही त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. डान्सिंग क्वीन स्पर्धेसाठी देशमुख यांनी अतिशय मेहनत घेतली. प्रत्येक फेरीत वेगवेगळ्या थीमवर त्यांनी बहारदार नृत्याविष्कार सादर केला. स्पर्धेचे किंग कोरिओग्राफर ओंकार शिंदे यांच्याकडून तिला बहुमोल मार्गदर्शन मिळाले. स्पर्धेच्या परीक्षक असलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व आरजे मलिष्का यांनी वेळोवेळी देशमुख यांच्या नृत्यकलेला उत्स्फूर्त दाद देत कौतुक केलं. महाअंतिम सोहळ्यात आदेश बांदेकर यांनी स्पर्धकांना किताब देवून त्यांचे कौतुक केले. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन अभिनेते अव्दैत दादरकर यांनी केले तर महाअंतिम सोहळ्यात सूत्रसंचालन निर्मिती सावंत यांनी केले. स्पर्धेत उपविजेती ठरल्यानंतर स्नेहा देशमुख म्हणाल्या की, या स्पर्धेमुळे अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. नृत्याबद्दलचा दृष्टीकोनही बदलला. तुमची कला तुम्ही जिद्द, मेहनत घेवून आत्मविश्वासाने सादर केली तर ती प्रेक्षकांपर्यंत चांगल्या रितीने नक्कीच पोहोचते व यशालाही गवसणी घालता येते.स्नेहा देशमुख यांना लहानपणापासूनच नृत्यकलेची प्रचंड आवड आहे. त्या नगरमधील लयशाला नृत्यकला निकेतनच्या संचालिका मंजुषा देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नृत्याचे धडे गिरवले आहेत. याशिवाय देशमुख यांना त्यांचे वडील मुकुंद देशमुख यांचेही नृत्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन लाभले. नगरमधील अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. पुण्यात सिंहगड कॉलेजमध्ये बी.ई.चे शिक्षण घेत असताना सिंहगड करंडक, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक अशा नामांकित स्पर्धात सहभाग घेत नृत्य व अभिनयाची अनेक बक्षिसे जिंकली आहेत. त्यावेळी तिला प्रसिध्द नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझा, सिनेदिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या हस्ते बक्षिसे मिळाली. 2014 मध्ये नाईन एक्स झकास या वाहिनीवरील लक्स झकास हिरोईन स्पर्धेतही तिने पहिल्या तिघांत स्थान पटकावले होते. ईटीव्ही वाहिनीवरील हृदयी प्रीत जागते या मालिकेत तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती व ती प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती. स्नेहा देशमुख यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.   

No comments:

Post a Comment