शिक्षकांच्या जुनी पेन्शन लढ्याला सर्वांच्या प्रयत्नाने यश ः प्राचार्य चौगुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

शिक्षकांच्या जुनी पेन्शन लढ्याला सर्वांच्या प्रयत्नाने यश ः प्राचार्य चौगुले

 शिक्षकांच्या जुनी पेन्शन लढ्याला सर्वांच्या प्रयत्नाने यश ः प्राचार्य चौगुले


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी 10 जुलै ची अधिसूचना अखेर शालेय शिक्षण विभागाने मागे घेतली आहे. त्यामुळे राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व अनुदानित व विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना आता दिलासा मिळाला आहे,  अशी माहिती जुनी पेन्शन समन्वय समितीचे  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा संयोजक प्राचार्य चंद्रकांत चौगुले यांनी दिली.
    दि. 10 डिसेंबर 2020 रोजी शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत शिक्षणमंत्री  वर्षाताई गायकवाड यांनी अधिसूचना रद्द करण्याचा निर्णयावर सही केली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व विविध संघटनांनी  केलेल्या आंदोलनामुळे व पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले. ही अधिसूचना मागे घेतल्याबद्दल  शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड  यांचे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींच्या वतीने अभिनंदन होत आहे.      
    जुनी पेन्शन लागू व्हावी, यासाठी आमदार भगवानराव साळुंके, आमदार ना.गो. गाणार, अरुण कडू, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, परिषदेचे शिक्षक नेते चंद्रकांत चौगुले, बापू जगताप, सुभाष ढेपे, अध्यक्ष शरद दळवी,  विठ्ठल ढगे, सतीश कर्डीले, वसंत राऊत, संपत झावरे, प्राचार्य बाळासाहेब वाकचौरे, डी.पी. कोपणार, पांडुरंग गोणे, दिलीप रोकडे, विजय गरड, मेघा कुलकर्णी, शेख समीना, सय्यद शाहीदा, शेख परवीन, अनिता सरोदे, सुषमा नगरकर, सुरसे दादा, कोतकर सर गोसावी सर आदींनी  परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment