कुमारसिंह वाकळे विकासाची दुरदृष्टी असलेले नगरसेवक : आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

कुमारसिंह वाकळे विकासाची दुरदृष्टी असलेले नगरसेवक : आ. संग्राम जगताप

 कुमारसिंह वाकळे विकासाची दुरदृष्टी असलेले नगरसेवक : आ. संग्राम जगताप


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः   शहराच्या विकास कामांबरोबरच उपनगरांतील विकास कामांना प्राधान्य दिल्यामुळे उपनगरांच्या विकासाला गती मिळाली आहे.  उपनगरांतील विस्तारीत भागात मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यापासून सुरुवात करावी लागते. कुमारसिंह वाकळे हे विकासाची दुरदृष्टी असलेले नगरसेवक आहेत. ते प्रभागातील नागरिकांना बरोबर घेऊन काम करतात. ग्रामीण स्वरुप असलेल्या नागापूर बोल्हेगाव परिसराला विकास कामांच्या माध्यमातुन त्यांनी नवी ओळख दिली आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.  प्रभाग क्र. 7 मध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून प्रेमभारती नगर ते गणराज कॉलनी येथे बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ नुकताच आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी मनपा विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक अ‍ॅड. राजेश कातोरे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखील वारे, दादा दरेकर, गजेंद्र भांडवलकर, बारसे, अजिंक्य आजबे, बबलू कराळे, हमीद बादशहा शेख, रुपेश कावळे, पठाण सर, शिर्के, ठाणगे, गिरगुणे, साठे आदी उपस्थित होते.यावेळी कुमारसिंह वाकळे म्हणाले की, गेल्या सात वर्षांमध्ये बोल्हेगाव नागापूर परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करीत आहे. आ. संग्राम जगताप यांच्या सहकार्यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलत आहे. विकास कामांबरोबरच सामाजीक उपक्रमांतुन सामाजीक बांधीलकी जोपासण्याचे कार्य सुरू आहे.

No comments:

Post a Comment