देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्यावतीने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्यावतीने

 देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्यावतीने

नगर-पुणे लोकल रेल्वेसेवा सुरू होण्याकरिता मिशन अंगण पुणे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  अहमदनगरचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी नगर-पुणे लोकल रेल्वेसेवा सुरु होण्याकरिता मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने मिशन अंगण पुणे सुरु करण्यात आले आहे. या मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करुन नगर-पुणे लोकल रेल्वेचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
    नगरकरांसाठी पुणे शहर अंगण ठरल्यास पुण्याच्या धर्तीवर शहराच्या झपाट्याने सर्वांगीन विकास साधला जाणार आहे. नगर-पुणे लोकल रेल्वेसाठी संघटना आग्रही असून, ही नवीन वर्षाची भेट नगरकरांना पाठपुराव्याने मिळवून घ्यावी लागणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
    नगर-पुणे लोकल रेल्वे सुरु झाल्यास नगरच्या उद्योगधंदे व व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. शहरातील बेरोजगार युवकांना पुणे येथे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मुंबईशी ठाणे लोकल रेल्वेने जोडले गेल्याने ठाणे शहराचा मोठा विकास झाला. त्याप्रमाणे अहमदनगरचा विकास देखील साधता येणार आहे. अहमदनगर शहर पुण्याशी रेल्वेने जोडणे अत्यंत महत्त्वाचे व विकासात्मक दृष्ट्या गरजेचे आहे. नगर-पुणे लोकल रेल्वेसेवा सुरु झाल्यास नगरकरांना पुणे हे अंगणप्रमाणे वाटणार असून, सहजपणे एक ते दीड तासात पुण्याला जाणे शक्य होणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. मिशन अंगण पुणे चळवळीसाठी सुहास मुळे, नाना बोज्जा, अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव, उषा निमसे, अशोक भोसले, पोपट भोसले, सखूबाई बोरगे आदि प्रयत्नशील आहेत

No comments:

Post a Comment