जिल्ह्यात शिवसेना वाढवायला मोठा वाव. -दादा भुसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 8, 2020

जिल्ह्यात शिवसेना वाढवायला मोठा वाव. -दादा भुसे

 जिल्ह्यात शिवसेना वाढवायला मोठा वाव. - दादा भुसे
कोरगावकर बाळासाहेंबाचा कट्टर शिवसैनिक...


अहमदनगर :-
नगर जिल्ह्यात पक्ष वाढीला मोठा वाव असून शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या रूपाने नगर जिल्ह्याला एक चांगला संपर्क प्रमुख लाभला आहे. कोरगावकर यांना संघटना बांधणीचा मोठा अनुभव आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून तयार झालेला हा मुंबईचा शिवसैनिक असून मुंबईत त्यांनी विभागप्रमुख म्हणून अनेक शाखांची जबाबदारी सांभाळली आहे. नगर जिल्ह्यात देखील शिवसेनेच्या शाखांची संख्या वाढविण्यासाठी कोरगावकर यांचे प्रयत्न व मार्गदर्शन निश्चितपणे उपयोगी पडेल असा विश्वास ना. भुसे यांनी व्यक्त केला .    
राज्याचे कृषी मंत्री आणि नगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. दादासाहेब भुसे हे सोमवारी नगर दौर्‍यावर होते . आपल्या दौर्‍यात त्यांनी नगरच्या शासकीय विश्रामग्रहावर शिवसेनेच्या निवडक पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. नगर शहर व जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न व्हावेत . नेते आणि कार्यकर्त्यांना काम करीत असताना कोणत्या अडचणी येत आहेत. त्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याची त्यांनी माहिती घेतली . येत्या काही दिवसात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संघटनेत काही फेरबदल करण्याचे सूतोवाच त्यांनी केले .  
नगर दक्षिणचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी पुष्प गुच्छ देऊन ना. दादासाहेब भुसे यांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात भाऊ कोरगावकर यांनी दादा यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले . भुसे यांचे सघंटन कौशल्य व मार्गदर्शन नगर जिल्ह्याला लाभले ही एक नगरच्या शिवसेनेसाठी उपयुक्त बाब आहे. आपल्या अभ्यासू वृत्तीतून व मनमिळावू स्वभावामुळे ना. शंकरराव गडाखव  दादासाहेब भुसे हे नगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकत वाढवतील . भुसे व गडाख यांच्या रूपाने नगर जिल्हा शिवसेनेला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. या दोघांमुळे सामान्य शिवसैनिकांचे विविध प्रश्न मार्गी लागून सामान्य कार्यकर्त्याला निश्चित न्याय मिळेल असा विश्वास कोरगावकर यांनी व्यक्त केला .       व यावेळी नगर दक्षिण चे प्रमुख   राजेंद्र दळवी ,  नगर उत्तर चे रावसाहेब खेवरे व राजेंद्र झावरे , उपजिल्हा प्रमुख  गिरीश जाधव , शहरप्रमुख  दिलीप सातपुते, आनंद लहामगे , विक्रम राठोड  आदी उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment