- Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

 विस वर्षापासून रखडलेली विकासकामे स्वप्नील शिंदे यांनी मार्गी लावली.-  जेष्ठ नागरिक कुमार नवले.


नगर-
गेल्या विस वर्षानपासून आम्ही सर्व नागरिक या नवले नगर परिसरात मनपाच्या मुलभूत सुविधानपासून वंचित होतो अनेक नगरसेवकांनी या भागात निवडून येण्यासाठी निवडणूकच्या वेळी खोटी आश्वासने दिली आणि निवडून आल्यावर परत दिसले नाही. विस वर्षापासून रखडलेली विकासकामे स्वप्नील शिंदे यांनी मार्गी लावल्याने नागरिकांच्या मनात चैतन्य निर्माण झाले. असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक कुमार नवले यांनी केले.
    प्रभाग चार मधील नवलेनगर येथील गजानन महाराज मंदिर परिसरातील माजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दहा कोटीच्या विकास योजनेतून रस्त्यांचे डांबरीकरण व कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक कुमार नवले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे, विनोद भिंगारे, विजय विधाते, महेश तनपुरे, विनायक शुकरे, चंद्रकांत जोशी, अमित गटणे, उमेश संतानी, अनिल तागड,ऋषिकेश देशमुख, महेश कुरे, रोहन सानप,सुरेश कुरलिये सह परिसरातील नागरिक उपस्थित होते. 
    या भागात आम्हाला गेल्या विस वर्षापासून पावसाच्या आधीच मनामध्ये एक भिती असायची कि जर या वर्षी मुसळधार पाऊस झाला तर घरात गुडघ्या इतके पाणी साचल्याने कसे राहता येईल. कारण ड्रेनेज लाईन नसल्यामुळे पावसाचे पाणी जाण्यास जागा नाही. पण आता स्वप्नील शिंदे यांनी विकास कामांचा सपाटा लावल्याने मूलभूत सुविधांचे काम होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या मनात कोणतीच भिती राहिली नाही. असे या भागतील महिलांनी या शुभारंभप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी स्वप्नील शिंदे म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवून मला नागरिकांनी मतदान केले आहे. प्रभागातील सर्व रखडलेली विकास कामे पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. या भागातील गजानन महाराज मंदिराच्या सभामंडपचे काम हि लवकर सुरु होणार आहे. सर्व मंजूर झालेली विकास कामे लवकरच सुरु होणार असून प्रभाग चारची वाटचाल आदर्श प्रभागच्या दिशेने सुरु झाली आहे. 

No comments:

Post a Comment