जीवन संगीत ग्रुप आयोजित ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

जीवन संगीत ग्रुप आयोजित ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ संपन्न

 जीवन संगीत ग्रुप आयोजित ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ संपन्न

फेसबुक लाईव्ह कार्यक्रमास प्रचंड प्रतिसादासह लाईक्सचा पाऊस


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर येथील जीवन संगीत ग्रुपच्यावतीने ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हा जुन्या चित्रपट गीतांवर आधारिक किशोर कुमार - कुमार सानू यांच्या गीतांचा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम नुकताच शांती ऑडिओ लाईव्ह या फेसबुक पेजच्या माध्यमातून संपन्न झाला. या कार्यक्रमास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जुन्या चित्रपट गीतांच्या अविट गोडीचे गारुड आजही रसिकांच्या मनावर कायम आहे हे सिद्ध झाले. या लॉकडाऊनच्या काळात थिएटरमध्ये जावून कार्यक्रमाचा आनंदास रसिक मुकले आहेत. त्यामुळेच जीवन संगीत ग्रुपने कार्यक्रम करण्याचे ठरविले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रथमच 100 एम.बी.इंटरनेट स्पीडचा वापर करुन हायडेफीनेशन व्हिडिओ ऑडिओद्वारे दर्जेदार कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमात अहमदनगर येथील प्रसिद्ध गायक संदिप भुसे व औरंगाबाद येथील पार्श्वगायिका संगिता भावसार यांनी किशोर कुमार व कुमार सानू यांची खास युगलगीते सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात किशोर कुमार यांच्या ज्युली चित्रपटातील ‘दिल क्या करे’ या गीताद्वारे संदिप भुसे यांनी केली. त्यानंतर कुमार सानू यांच्या ‘एक लडकी को देखा’ या अतिशय श्रवणिय गीताला कमेंटस्चा पाऊस पडला.
संदिप भुसे व संगीता भावसार यांनी ‘आपकी आँखोंमें कुछ... दिल है कि मानता नही..., तेरा दिल भी..., तेरे हम ओ सनम..., नजर के सामने..., धिरे धिरे से मेरे...,  जबसे तुमको देखा है समन..., अशी बहारदार रोमॅटिक युगलगीते सादर केली. ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ या यॉडलिंगवर आधारिक अंदाज या चित्रपट गीताने संदिप भुसे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांती ऑडिओचे राजू ढोरे, दिनेश घेवरे, अभिनंदन ढोरे, फरहान शेख, स्क्रिप्ट रायटर वाजीद खान यांनी विशेष परिश्रम घेतले. रसिकांच्या उंदड प्रतिसादामुळे दर शनिवारी अशा मैफिलींचे आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी संदिप भुसे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment