राष्ट्रवादीच्या या नेत्याला ईडीची नोटी? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

राष्ट्रवादीच्या या नेत्याला ईडीची नोटी?

 एकनाथ खडसेंना ‘इडी’ची नोटीस ?

आता ‘सिडी’ची प्रतीक्षा..


मुंबई : त्यांनी माझे मागे ‘इडी’ लावली तर मी ‘सिडी’ लावील.. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शरद पवारांसमोर एकनाथ खडसे बोलले तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या आता खडसेंना ‘इडी’ ने नोटीस बजावली आहे. आता खडसे ‘सिडी’ कधी लावतील याची प्रतीक्षा आहे. पण खडसे म्हणतात मला अजून ‘ईडी’ची नोटीस मिळाली नाही.

भाजपचा झेंडा खांद्यावरुन उतरवुन मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार्‍या एकनाथ खडसेंच्या मागे ईडीची टीकटीक सुरु झाल्याची जोरदार चर्चा  सुरु झाली आहे. भोसरी भूखंड प्रकरणी एक नाथ खडसेंना ईडीने नोटीस पाठवली असून त्यांना चौकशीसाठी बोलावल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनी यावर प्रतिक्रिया देताना ईडीची कोणतीच नोटीस मला आली नसल्याचे म्हटले आहे. मात्र यावेळी त्यांनी आपल्याला नोटीस येणार असल्याची माहिती मिळाली असल्याचेही सांगितले आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार आहे.
मला अनेकांकडून नोटीस येणार असल्याचे कळाले आहे. जिथपर्यंत मला कळाले आहे ही नोटीस पुण्यातील भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. ख्रिसमसची सुट्टी असल्याने कदाचित नोटीस अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही. कोणत्याही तपास यंत्रणेने नोटीस पाठवली तरी मी चौकशीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहे. कारण मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याचे कारणच नाही, असे एकनाथ खडसेंनी बोलताना सांगितले. पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, माझ्याविरोधात सुरु असलेल्या चौकशांमुळे आश्चर्य वाटत आहे. मला नेहमी वाटायचे की ईडी 100 कोटी किंवा त्याहून अधिकच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालते. जर हे पुणे जमीन प्रकरणाबद्दल असेल तर त्यात चार कोटींहून कमी व्यवहार आहे. ज्या जमिनीबद्दल चर्चा आहे ती माझी पत्नी आणि जावयाने विकत घेतली होती. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आहे, असे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment